वारणा-कोडोली परिसर केमिस्ट असोसिएशन तर्फे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. मदन कृ पाटील भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
वारणा-कोडोली परिसर केमिस्ट असोसिएशन तर्फे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. मदन कृ पाटील भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
पन्हाळा प्रतिनिधी .शंकर कुंभार- वारणा-कोडोली व परिसर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने तसेच कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे लोकप्रिय अध्यक्ष मा. श्री. मदन कृ पाटील भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराचे उद्घाटक मा श्री वसंतराव चव्हाण बहिरेवाडी यांच्या शुभहस्ते झाले या रक्तदान शिबिरासाठीअनमोल असे मार्गदर्शक मा श्री दिनेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिराला परिसरातील तरुणाई, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी सहभागी होऊन रक्तदान करून मानवतेचे व सामाजिक उत्तरदायित्वाचे उदाहरण घालून दिले. शिबिरात एकूण शेकडो बाटल्या रक्तसंकलन झाले. या उपक्रमासाठी वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोडोली तसेच डॉ दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बोरपाडळे या आरोग्य विभागातील तज्ञ डॉक्टर व नर्सिंग स्टाफ यांनी सहकार्य केले.यावेळी प्रमुख उपस्थिती कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन कोल्हापूर उपाध्यक्ष माननीय श्री किरण जाधव सर त्याचबरोबर पन्हाळा तालुका केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष मा श्री शहाजी यादव तसेच उपाध्यक्ष माननीय श्री दिलीप साळोखे भाऊ तसेच वारणा कोडोली केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष माननीय श्री दीपक पाटील सर त्याचबरोबर श्री निलेश पाटील श्री पंकज कोळी श्री सौरभ दुर्गाडे श्री प्रमोद पाटील श्री पोपटराव केकरे आदी केमिस्ट उपस्थित होते या रक्तदान शिबिराचे खास वैशिष्ट्ये म्हणजे उद्घाटक माननीय श्री वसंतराव चव्हाण बहिरेवाडी यांनी आज पर्यंत 116 वेळा रक्तदान केले असून आज कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनअध्यक्ष माननीय श्री मदन पाटील भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त 117 वेळी रक्तदान केले त्यांचा पन्हाळा तालुका केमिस्ट असोसिएशन उपाध्यक्ष माननीय श्री दिलीप साळोखे भाऊ यांच्या शुभ हस्ते यथोचित्त असा सत्कार करण्यात आला त्यावेळी बोलताना मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, “रक्तदान हे जीवनदान असून अशा उपक्रमातून समाजात ऐक्य, प्रेम व सेवाभाव वृद्धिंगत होतो,” असे सांगितले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वारणा-कोडोली परिसरातील सर्व केमिस्ट बंधूंनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवर व रक्तदाते यांनी मा. श्री. मदन कृ पाटील भाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे कार्य समाजकारणात असेच प्रेरणादायी राहो अशी भावना व्यक्त केली.या निमित्ताने केमिस्ट असोसिएशनचा सामाजिक उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरला
रणभूमीवर जाऊन देशाचे रक्षण करणे शक्य नसेल तर एक थेंब रक्तानेही आपण जीव प्राण वाचू शकतो . . . .





