बाबो…..सांगोला तालुक्यात पुन्हा एकदा राजरोसपणे वृक्षतोड ; वनविभागातील तो रक्षकच बनत आहे भक्षक
या अगोदरचे सांगोल्याचे वन विभाग संबंधित अधिकारी ,तुकाराम जाधवर असताना विनापरवाना वृक्षतोड वाहतूक करायची कोणाची हिम्मत होत नव्हती. परंतु नूतन आलेले सांगोला वन विभागाचे संबंधित अधिकारी यांना याची सर्व माहिती असून देखील, गप्प का? त्यांना कधी फोन केला असता, तर कधी फोन घेतात ,पण बोलतात मिंटीगमध्ये तर कधी फोन घेण्यास टाळाटाळ करत असतात,अशी परिस्थिती असताना या भागातील नेमून दिलेले वनरक्षकांना त्या भागातील लाकूड व्यापारी मंथली चिरीमिरी देत आहेत का? अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. परंतु या वन विभागाच्या अधिकाऱ्यामुळे व वनरक्षकामुळे काही लाकूडतोड व्यापाऱ्यांकडून जवळा घेरडी भागात बोलले जात आहे की, कोणाच्या शेतात काही लाकूड असेल तर आम्हाला द्या त्याची जबाबदारी आम्ही घेतो आता काही आपल्याला घाबरायची गरज नाही , आमचे सर्व व्यापारांचे हात त्या वनरक्षकापासून ते संबंधित अधिकारी यांच्यापर्यंत आहेत यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांना वचक कोणाचाच राहिला नाही, तरी या वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना वनरक्षकांना तसेच विनापरवाना लाकूडतोड करणाऱ्यांना वचक कोणाचा नसल्याने हे भर दिवसा फोफावले आहेत, तरी याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे अशी चर्चा तालुक्यातील शेतकरी व नागरिकां मधून होत आहे.या होणाऱ्या नुकसानीचे कोणालाच काही देणे घेणे राहील्याची परिस्थितीती निर्माण झाली आहे.