चिणके ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे भीमा बजबळकर विजयी
चिणके ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे भीमा बजबळकर विजयी

सांगोला प्रतिनिधी – रवीराज शेटे
चिणके ता. सांगोला प्रभाग क्रमांक तीन मधील ग्रामपंचायत सदस्य तानाजी कवठेकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवडणूक लागली होती व यासाठी भीमा गोरखनाथ बजबळकर व सोमनाथ चंद्रकांत खंडागळे यांनी अर्ज भरला होता.शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेत सोमनाथ चंद्रकांत खंडागळे यांनी अर्ज माघार घेतल्याने भीमा बजबळकर विजय झाले. तहसीलदार बाळू ताई भागवत, नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब शिंदे व मधुकर वाघमोडे यांनी काम पाहिले.विजयी उमेदवार भीमा बजबळकर यांचे मा. आमदार शहाजी बापू पाटील व शहाजी बापू पाटील कट्टर समर्थक चिनके ग्रुप यांनी अभिनंदन केले आहे.




