ओबीसी आरक्षण आबाधित ठेवण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही: डॉ. स्नेहाताई सोनकाटे
ओबीसी आरक्षण आबाधित ठेवण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही: डॉ. स्नेहाताई सोनकाटे
समता परिषद पदाधिकारी बैठक, आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण, पदाधिकारी निवडी व इंजि. रामचंद्र घुटुकडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
सांगोला /प्रतिनिधी: रवीराज शेटे
सांगोला तालुक्यातील घुटुकडे बंधू हे खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लढा देत आहेत. घुटुकडे बंधूंना समता परिषदेचे मोठे पद देऊन गौरविण्यात येणार आहे. समता परिषदेचे नेते व ओबीसीचे सर्वेसर्वा नाम .छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली चळवळ भरारी घेत आहे. ओबीसीचे 27 टक्के आरक्षण हे कायम राहिले पाहिजे यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. समता परिषद अन्यायग्रस्तांना न्याय देणार आहे. छगन भुजबळ हे पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत. आमचे नेते छगन भुजबळ यांना कोणी टार्गेट केलेले आम्हास चालणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसीच्या पाठीशी आहेत. राज्यात ओबीसीची प्रचंड ताकद आहे आरक्षणाचा लढा हा काही काळ चालणार आहे. ओबीसीचे आरक्षण धोक्यात येण्याची चिन्हे असल्याने ओबीसी समाजाने आपले आरक्षण टिकवण्यासाठी दक्ष राहिले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा देण्याची गरज आहे. ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन ओबीसीचा एल्गार करूया. असे विचार समता परिषद प्रदेश सरचिटणीस डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांनी सांगोला येथे व्यक्त केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सांगोला यांच्यावतीने पदाधिकाऱ्यांची बैठक, इंजिनिअर रामचंद्र घुटुकडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण व पदाधिकारी निवडी कार्यक्रम बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी सदानंद मल्टीपर्पज हॉल सांगोला येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता परिषदेच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. स्नेहाताई सोनकाटे या होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी ओम काली हिंदवी स्वराज्य सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष उल्हास धायगुडे पाटील, पत्रकार कैलास गोरे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुदर्शन घेरडे, प्रा. आर. वाय घुटुकडे, इंजि. रामचंद्र घुटुकडे, दक्ष कोळेकर यांच्यासह आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ओबीसीचा लढा रस्त्यावर उतरून चालू ठेवावा लागेल. तरच सर्व समाजांना न्याय मिळेल. प्रा.आर. वाय घुटुकडे बंधू संघर्ष करणारे नेतृत्व आहे.
या कार्यक्रमासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत, संपादक चाँद भैय्या शेख , समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शंकरराव लिंगे, प्रा. राजेंद्र कोळेकर सिद्धेश्वर आवारे, आकाश पवार, राज माने, बाबासाहेब भंडारे ,नागेश थोरात, आबासाहेब खरे ,सीमाताई एकतपुरे, मधुकर माळी, दिलीप केसकर, गोरख चोरमुले, हरिभाऊ गावंधरे, बबनराव गायकवाड, नितीन सरतापे, सांगोला शहराध्यक्ष भैरवनाथ बुरांडे, चंद्रशेखर जाधव, अमोल माळी, सूर्यकांत आदाटे, परमेश्वर गेजगे यांच्यासह आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे. ओबीसीचा नारा मंत्रालयापर्यंत पोहोचवू. आम्ही विचाराने समृद्ध आहोत. गल्लीतल्या घटकाला दिल्लीत न्याय मिळत नाही. त्यासाठी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत या निवडणुका न्यू राष्ट्रीय समाज पार्टी सर्वांना सोबत घेऊन लढवणार आहे. समता परिषद, ओबीसी समाज, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी यांच्या माध्यमातून सर्वसामान्यालाही उमेदवारी दिली जाईल . आगामी सर्व निवडणुका या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या नेतृत्वाखाली तालुक्यात लढवल्या जातील. यासाठी पूर्वतयारी म्हणून आजचा कार्यक्रम आहे. तालुक्यातल्या प्रस्थापितांना आमच्या विचाराने आम्ही सळो की पळो करून सोडू. आमचे ध्येय आम्ही साध्य करू.
: प्रा. आर. वाय. घुटुकडे, ओबीसचे तालुक्याचे युवा नेते, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी सांगोला.
आयुष्यात पुढे जाण्यासाठी चळवळ हे माध्यम आहे. समता परिषदेत ओबीसी चळवळीत काम करणार आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आम्ही आमच्या अस्तित्वासाठी व चांगल्या विचारासाठी विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन लढा उभारत आहे. लोकसभा निवडणूक असो विधानसभा निवडणूक असो या निवडणुका आम्ही स्वतः लढविलेल्या आहेत. न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वसामान्य सोबत घेऊन स्वबळावर लढवणार आहोत. रामचंद्र घुटुकडे यांच्या अभिष्टचिंतन सोपान निमित्त सांगोला तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सलमान सोहळा संपन्न झाला
: इंजि. रामचंद्र घुटुकडे, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष




