ब्रेकिंग न्यूज

आमदार बाबासाहेब देशमुख, तहसीलदार, प्रांत यांना कडलास ग्रामपंचायत यांच्या कडून निवेदन


आमदार बाबासाहेब देशमुख, तहसीलदार, प्रांत यांना कडलास ग्रामपंचायत यांच्या कडून निवेदन

इंदापूर -विजापूर राष्ट्रीय महामामार्गवरील कडलास (लिगाडे वाडी) येथील रस्त्याचे काम त्वरित चालू करण्यासाठी तहसीलदार, विदयमान आमदार, प्रांत यांना यांना ग्रामपंचायत कडलास यांच्या वतीने निवेदन.

प्रतिनिधी शशिकांत कोळी.इंदापूर -विजापूर राष्ट्रीय महामार्गवरील मौजे -कडलास ता. सांगोला गाव हद्दीतील उतरेकडील कडलास ते सांगोला (लिगाडेवाडी ) या मार्गांवरील अंदाजे 1किमी सदया सिंगल लेन असून त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले होते त्यानंतर आपल्या कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्या नंतर काम सुरु झाले परंतु सदरचे काम अगदी संथ गतीने सुरु आहे त्यामुळे या मार्गांवरील वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होत असून वाहन चालकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण देखील वाढत असून जनतेच्या जीविताला धोखा निर्माण झाला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूस लोक वस्ती आहे. या रस्त्यावरून सतत अवजड वाहनांची वाहतूक होत असल्या कारणाने दुचाकी धारकांना व परिसरातील लोकांना धुळीच्या प्रदूषणाचा प्रचंड त्रास होत आहे त्यातच उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे व प्रदूषणामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे मौजे कडलास गावातील ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले असून सदरचा रस्ता त्वरित नाही झाल्यास किंवा त्यावर उपाय योजना न केल्यास रास्ता रोको किंवा आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.तरी रस्त्याची तातडीने तपासणी करून त्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील व अपघातांना आळा बसेल आपल्या तातडीच्या कार्यवाही ची अपेक्षा आहे.
निवेदन देते प्रसंगी .सोलापूर दुध संघांचे संचालक मारुती लवटे, माजी उपसंरपंच समाधान पवार, माजी उपसरपंच सुनील पाटील, गणपतराव देशमुख सहकारी सूतगिरणी चे व्हाईस चेरमन नितीन गव्हाणे. विकास सेवा सोसायटी चे संचालक अरुण वाघमोडे, राहुल पाटील, महादेव लेंडवे, अशोक ठोकळे, निलेश अनुसे, प्रशांत तेली आदी उपस्थितीत होते.

:-इंदापूर -विजापूर राष्ट्रीय महामार्गवरील मौजे -कडलास (लि्गाडेवाडी )रस्त्याचे काम त्वरित सुरु व्हावे. अन्यथा रास्ता रोको किंवा आमरण उपोषण करू -कडलास ग्रामस्थ.


Translate »
error: Content is protected !!