मिरजेत मिशन हॉस्पिटल चौकातील सिग्नल बंद करण्याबाबत वाहतूक शाखेस रिक्षा संघटनेचे निवेदन
सांगली प्रतिनिधि इरफान बारगीर – मिरज मिशन हॉस्पीटल चौक येथे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागत वंटमुरे कॉर्नर ते आंबेडकर गार्डन व परमशेट्टी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असलेमुळे सर्व वाहतुक मेन रोडवरून होत असलेमुळे वाहतुकीचा प्रचंड समस्या निर्माण झाली आहे. वाहनांची कोंडी होत आहे. मिशन चौकामध्ये सिग्लन पडले तर मिशन चौक ते वंटमुरे कॉर्नर व मिशन चौक ते रहेमतुल्ला हॉटेल पर्यंत लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण होत आहे.सध्या दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. टॅफिकमुळे मुलांना वेळेत परीक्षेस पोहचणे अवघड झालेले आहे. तसेच मिरज हे आरोग्य पंढरी म्हणून नावारूपास आलेले शहर आहे त्यामुळे ट्रॅफिकजाम होऊन ॲब्युलन्सला मार्ग काढणे देखील अडचण झाले आहे.तरी आपणांस विनंती वंटमुरे कॉर्नर ते आंबेडकर उद्यान पर्यंत तसेच परम शेट्टी हॉस्पिटल कडे जाणारा रस्ता हा पर्यायी मार्ग तयार होईपर्यंत मिशन चौकातील सिग्नल बंद करावा.सिग्नल चालू ठेवण्यास आमची काही हरकत नाही फक्त पर्यायी रस्ता चालू होईपर्यंत मिशन चौकातील सिग्नल बंद करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला उपस्थित असलेले रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले रफिक खतीब सुहास कांबळे महेश सातवेकर वसीम सय्यद मोहसीन मकानदार शिवाजी जाधव रजाक मलिक वाले बापू कांबळे सुभान बागवान राजू जाधव संदीप पवार मोसिन पठाण संतोष अंकलखोपे तुषार माने आधी पदाधिकारी उपस्थित होते