कोडोली (ता. पन्हाळा) येथे भूमी अभिलेख कार्यालय, पोस्ट ऑफिस व अंगणवाडीसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याची दलित महासंघाची मागणी
कोडोली (ता. पन्हाळा) येथे भूमी अभिलेख कार्यालय, पोस्ट ऑफिस व अंगणवाडीसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याची दलित महासंघाची मागणी
पन्हाळा प्रतिनिधी ..शंकर कुंभार कोडोली (ता. पन्हाळा) येथे नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या भूमी अभिलेख कार्यालय, पोस्ट ऑफिस कार्यालय तसेच अंगणवाडी केंद्रासाठी तातडीने शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने माननीय पन्हाळा नायब तहसीलदार मा श्री विजय जाधव साहेब व कोडोली ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
सध्या कोडोली ता पन्हाळा ग्रामपंचायतच्या हद्दीत असणारे भूमी अभिलेखचे ऑफिस वर्षानुवर्षे खाजगी इमारतीमध्ये भाडेतत्त्वावर आहे कळवली ग्रामपंचायतच्या माध्यमातून भूमी अभिलेख चे ऑफिस स्वतःच्या जागेत स्थलांतरित करण्यासाठी कोडोली ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी तसेच कोडोली गावातील अंगणवाडी सुद्धा भाडेतत्त्वावर खाजगी इमारतीमध्ये असून त्यांना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन तात्काळ जागा उपलब्ध उपलब्ध करून द्यावी तसेच पोस्ट ऑफिस कार्यालय यांनाही जागा उपलब्ध करून द्यावी त्यावेळी दलित महासंघाचे जिल्हा संघटक श्री गणेशराव धनवडे तसेच कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष मा श्री सागर लोंढे तसेच पन्हाळा तालुका सदस्य श्री नितीन पांढरे व हातकणंगले तालुका अध्यक्ष श्री गोरख सावंत तसेच कोडोली शहर अध्यक्ष श्री गणेश काळे आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होतेकोडोली गावात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून शासकीय सेवा व सुविधांची गरज दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गावातील शेतकरी व नागरिकांना जमिनीशी संबंधित दाखले व कागदपत्रे मिळवण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय अत्यंत आवश्यक आहे. तसेच पोस्ट ऑफिसच्या सोयीमुळे पत्रव्यवहार, बँकिंग सेवा व इतर शासकीय योजना थेट गावात पोहोचू शकतील. लहान मुलांच्या संगोपन व प्राथमिक शिक्षणासाठी अंगणवाडी केंद्र अनिवार्य असून त्यासाठी सध्या जागेची कमतरता भासत आहे.या तिन्ही महत्त्वाच्या शासकीय सुविधा गावात सुरू आहेत पण भाडेतत्त्वावर आहेत त्यांना ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जागा उपलब्ध करून मिळावी असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.या प्रसंगी दलित महासंघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी नायब तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करून ही मागणी तातडीने मंजूर करण्यात यावी, अशी ठाम भूमिका घेतली.
CBS News मराठी ———————–
संपूर्ण महाराष्ट्रात गाव, शहर, तालुका, जिल्हा, विभागसाठी सीबीएस न्युज मराठी साठी पत्रकार नेमणूक सुरु आहेत…
आताच संपर्क करा – 9922570896




