प्रतिनिधी शशिकांत कोळी -कष्ट, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाची नवी उंची गाठत पल्लवी गोरख तामखडे हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबीयांसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पल्लवीने NEET परीक्षेत 720 पैकी 616 गुण मिळवत ऑल इंडिया रँक (AIR) 5781 तसेच ओबीसी रँक 2395 प्राप्त केली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे ती वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करणार आहे.
पल्लवीच्या यशामागे तिची अथक मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे प्रोत्साहन आणि गुरुजनांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल तिचे आई-वडील, शिक्षक, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तिच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली असून, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे पल्लवीने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
पल्लवी गोरख तामखडे हिला पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी घेरडी ग्रामस्थ व सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.