ब्रेकिंग न्यूज

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आहे


पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आहे
सांगली प्रतिनिधी इरफान बारगीर – पीपल्स रिपब्लिकन पार्टी, सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला आमचा ठाम विरोध आहे. अशी मागणी करण्यात आली
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील समता, सामाजिक न्याय आणि समान हक्कांच्या तत्त्वांना उपवर्गीकरणामुळे धक्का पोहोचण्याची भीती आहे. अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पाडणारा कोणताही निर्णय आम्हाला मान्य नाही. सामाजिक ऐक्य अबाधित राखण्यासाठी व संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी आमची ठाम मागणी आहे.आमच्या प्रमुख मागण्या :अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा.
संविधानाने अनुसूचित जातींना दिलेले आरक्षण व हक्क कोणत्याही प्रकारे विभाजित करू नयेत.सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करावे.उपरोक्त मागण्यांचा गांभीर्याने विचार करून शासनाकडे योग्य ती कार्यवाही करण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष एजाज मोमीन सागली जिल्हा संघटक गुलाम रसूल शेख सांगली शहर जिल्हा अध्यक्ष अकबर सय्यद मिरज विधानसभा अध्यक्ष शकील शेख सांगली विधानसभा अध्यक्ष सुनील वाघ श्रावण बानणसोडे विश्वास कांबळे सागर लोंढे अभिषेक कांबळे सचिन सज्जन व
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे
सांगली जिल्ह्यातील सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Translate »
error: Content is protected !!