ब्रेकिंग न्यूज

सांगोल्यात दिवसाढवळ्या डिकी फोडून 80 हजार लंपास ; बागलवाडीच्या शेतकऱ्याचा घाम आणि विश्वास एकाच वेळी गेला


सांगोल्यात दिवसाढवळ्या डिकी फोडून 80 हजार लंपास ;
बागलवाडीच्या शेतकऱ्याचा घाम आणि विश्वास एकाच वेळी गेला
सांगोला प्रतिनिधी – चाॅदभैय्या शेख- बँकेतून मजुरांच्या पगारासाठी काढले 80 हजार रुपये घेऊन घरी परतणाऱ्या 65 वर्षीय शेतकऱ्याच्या मोटारसायकलची डिकी फोडून अज्ञात चोरट्यांनी पैसे लंपास केल्याची खळबळजनक घटना मंगळवार दि. 7 जुलै रोजी सायं. 4.30 च्या सुमारास शिवाजी चौकात घडली. याप्रकरणी 11 जुलै रोजी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काय घडलं? बागलवाडी ता. सांगोला येथील सिद्धेश्वर दत्तू चव्हाण वय 65 हे शेतकरी आहेत. ट्रॅक्टरचा हप्ता आणि मजुरांचा पगार देण्यासाठी त्यांनी मंगळवारी सायंकाळी 4 वाजता सांगोला येथील SBI बँक, वांढव नाका शाखेतून 500 च्या 160 नोटा म्हणजे 80 हजार रुपये काढले.ते पैसे पांढऱ्या पिशवीत घालून त्यांनी आपली HF डिलक्स मोटारसायकल क्रमांक MH-45-O-3044 च्या डिकीमध्ये ठेवले. त्यानंतर कपडे शिवायसाठी ते शिवाजी चौकात गेले. अर्ध्या तासाने परत आल्यानंतर त्यांना डिकीचे कुलूप तोडलेले दिसले. आत पाहिले तर पांढरी पिशवी आणि त्यातील 80 हजार रुपये गायब होते.”पहाटे 4 ला शेतात असतो. हे पैसे मजुरांसाठी आणि हप्त्यासाठी होते. आता काय करू?”असे म्हणताना सिद्धेश्वर काकांना गहिवरून आले.पोलिसांचा तपास या प्रकरणी सिद्धेश्वर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 379 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शेख हे करत आहेत.जनतेचा सवाल शिवाजी चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी आणि बँकेच्या जवळच अशी घटना घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. “CCTV कॅमेरे आहेत मग आरोपी सापडत का नाहीत? बँकेबाहेर पोलीस गस्त का नाही?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.गेल्या काही दिवसांपासून सांगोल्यात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Translate »
error: Content is protected !!