नाझरे प्रतिनिधी रवीराज शेटे
श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नाझरे ता. सांगोला येथील प्राध्यापक अशोक मार्तंड बनसोडे यांचे शनिवार दि. 11 जुलै रोजी रात्री अकरा वाजता पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 56 होते.
बनसोडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम सोमवार दिनांक 13 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता बेलवण नदी माळेवाडी अनकढाळ येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.