ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा लिलाव पारदर्शक पणाने झाला पाहिजे – शेतकऱ्यांची मागणी


शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा लिलाव पारदर्शक पणाने झाला पाहिजे – शेतकऱ्यांची मागणी

सांगोला प्रतिनिधी – बाळासाहेब वाळके
सांगोला शहरातील,मार्केट यार्ड व मंडईत ,शेतीमाल, भाजीपाला विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यांच्या, शेतीमालातून आडत ,कडता, कमिशन ,अडते व व्यापाऱ्यांनी अजिबात घेऊ नये , तसेच शेतीमाल मार्केट कमिटीच्या आवारात आल्या आल्या, तात्काळ इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन करून वजन चिट्ठी आलेल्या व्यक्तीस देणे, व शेतीमालाचे लिलाव पारदर्शक पद्धतीने मोठ्याने बोलून, पुकारून लिलावात विक्री केलेल्या किमतीलाच पक्या पावतीवर लिहून, त्या त्या शेतकऱ्यांना त्यांची पक्की पावती व बिल तात्काळ दिली पाहिजेत. काही अडते व भाजीपाला लिलाव करणारे, पक्की बिल व तात्काळ पैसे शेतकऱ्यांना देत नाहीत. अशा पडते,व्यापाऱ्यांचे परवाने तात्काळ रद्द करून ,त्यांनी शेतीमाल अजिबात खरेदी करू नये, केल्यास पणन. कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशा प्रकारचे निवेदन संबंधित नगरपालिका मुख्याधिकारी, सांगोला उपनिबंधक , मार्केट कमिटी सचिव, यांना देण्यात आले आहे. संबंधित मुद्द्यांची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास, डी डी आर सोलापूर ,कलेक्टर सोलापूर व पणन संचालक पुणे यांच्याकडे आम्हाला दाद मागावी लागेल .तरीही न्याय न मिळाल्यास संबंधिता विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल. याची दखल घ्यावी व शेतकरी बांधवांना न्याय द्यावा. त्यांचा आशीर्वाद संबंधित आणि घ्यावा.


Translate »
error: Content is protected !!