भिगवण मध्ये शेतकऱ्यांची दूध व ऊस परिषद मोठ्या उत्साहात संपन्न
भिगवण मध्ये शेतकऱ्यांची दूध व ऊस परिषद मोठ्या उत्साहात संपन्न
भिगवण मध्ये शेतकऱ्यांची दूध व ऊस परिषद मोठ्या उत्साहात संपन्न
.ठराव क्रमांक एक.-1,,) शेतकऱ्यांवर असलेली सर्व प्रकारची, सर्व कर्जे ,ही अनैतिक असून ,यास,सरकारच जबाबदार आहे .म्हणून सरकारचे चुकीचे धोरण, हेच सर्वांच्या ,कर्जाचे, गरिबीचे ,आत्महत्येचे खरे कारण होय .म्हणून कोणाही शेतकऱ्यांनी, कोणालाही भिऊन ,आपली मालमत्ता विकून अथवा सावकारांकडे किंवा अन्य व्यक्ती संस्थांकडून कर्ज काढून, कर्जे अजिबात भरू नयेत. सरकारने सर्व शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या कर्जातून सरसकट कर्जमुक्ती द्यावी .असा ठराव सर्वांमध्ये संमत करण्यात आला .ठराव क्रमांक २)उसाला प्रति टन कमीत कमी पाच ते सात हजार रुपये दर द्यावा .ठराव क्रमांक ३) गाईच्या दुधाला डिझेल एवढा व म्हशीच्या दुधाला पेट्रोल एवढा दर देण्यात यावाच .ठराव क्रमांक ४) सर्व शेतीमालावरची निर्यात बंदी उठवावी. ठराव क्रमांक ५) दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराचीअट तात्काळ रद्द करावी. ठराव क्रमांक ६)गौवशहत्या बंदी कायदा, तात्काळ रद्द करण्यात यावा. अशा प्रकारचे तमाम जनतेचे हिताचे व देशाच्या हिताचे ठराव या ऊस व दूध परिषदेमध्ये पारित करण्यात आले .सर्वानुमते .या परिषदेस शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, शेतकऱ्यांचे पंचप्राण ,आदरणीय रघुनाथ दादा पाटील कार्याध्यक्ष कालिदासजी आपेट ,उपाध्यक्ष हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठ एडवोकेट अजित काळे तसेच माझी सनदीअधिकारी व सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी माननीय सुरेश खोपडे साहेब ,विजय कोलते अध्यक्ष. महिला आघाडीचे अध्यक्षा, डॉक्टर प्रगती चव्हाण व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणतेही कर्जासाठी कोणालाही भिऊन आत्महत्या करू नये ,जर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जाचा तगादा कोणाही कडून आला असेल ,त्यांनी शेतकरी संघटनेची संपर्क साधावा. असे जाहीर आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी केले आहे.