ताज्या घडामोडी

माणगंगा परिवारातर्फे उद्या सेवानिवृत्तांचा सन्मान सोहळा


माणगंगा परिवारातर्फे उद्या सेवानिवृत्तांचा सन्मान सोहळा

सांगोला, प्रतिनिधी : रवीराज शेटेमानगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व मानगंगा उद्योग समूह, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांच्या सन्मानार्थ विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. 7 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता एमबीएम मॉल, दुसरा मजला, एस.टी. स्टँडच्या पाठीमागे, सांगोला येथे संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोलाचे सचिव विठ्ठलराव शिंदे तसेच सोलापूर जिल्ह्याचे माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी तानाजीराव घाडगे उपस्थित राहणार आहेत.समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत राहून आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या सेवानिवृत्त मान्यवरांचा यावेळी मानगंगा परिवाराच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.या सन्मान सोहळ्यास नागरिकांनी व मानगंगा परिवाराच्या सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मानगंगा परिवाराचे अध्यक्ष तथा सांगोला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी केले आहे.

Translate »
error: Content is protected !!