कुंभार बांधवांकडूनच गणेश मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन
कुंभार बांधवांकडूनच गणेश मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन
कुंभार बांधवांकडूनच गणेश मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन

गावकऱ्यांना पुरवण्याचे काम हा आमचा समाज करत असतो काही समाजकंटक गणेश मूर्ती बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करतात त्यामुळे आमच्या कुंभार मूर्ती कलाकार बांधवाने पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या मूर्तींची मागणी कमी होत चालली आहे. या स्थितीत खऱ्या अर्थाने मेहनत घेऊन मूर्ती साकार करणाऱ्या कुंभार बांधवांचेउपजीविकेवर संकट कोसळले आहे.कुंभार समाजाच्या मेहनतीला व परंपरेला न्याय मिळावा यासाठी प्रत्येकाने स्थानिक कुंभार कारागिरांकडूनच गणेश मूर्ती खरेदी करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या हाताला काम मिळेल तसेच स्थानिक कुटुंबांचे आर्थिक चक्रही फिरू शकेल.यंदाच्या गणेशोत्सवात “घरचा गणपती – घरच्या कुंभाराकडूनच” हा संदेश प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवला जात आहे.कुंभार बांधवांच्या कष्टातून घडविलेल्या प्रत्येक मूर्तीमध्ये केवळ कलाच नाही तर त्यांची जीवनशैली, संस्कृती व परंपरेचे दर्शन घडते. त्यामुळे प्रत्येक भाविकाने या वर्षी आपल्या घरच्या बाप्पाची मूर्ती स्थानिक कुंभार कारागिरांकडूनच घेऊन त्यांना साथ द्यावी, असे आवाहन सामाजिक संघटनांकडूनही होत आहे.