मिरजेच्या शैलेश कदम यांची पहिल्या जागतिक योगासन चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सुवर्ण पदक मिळवून उत्तम कामगिरी
सांगली – इरफान बारगीर – अहमदाबाद येथे पार पडलेल्या पहिल्या जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेत जगभरातील ७० हून अधिक देशांमधील शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला. या ऐतिहासिक स्पर्धेत खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये १० ते ५५ वयोगटा मध्ये कलात्मक आणि लयबद्ध योगासनांच्या सात मुख्य प्रकारांत स्पर्धा झाल्या. त्यामध्ये बॅक बेंडिंग मेन्स सिनियर मधे श्री अंबाबाई तालीम मिरज चे योगपटू आणि शिक्षक श्री.शैलेश कदम यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक प्राप्त करून जगात आपल्या श्री अंबाबाई तालीम संस्थेचे नांव सुवर्ण अक्षरात नोंदवले. त्याबद्दल त्यांचे क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.