ताज्या घडामोडी

शारदीय नवरात्र उत्सवासाठी दुर्गामाता मूर्ती घडविण्याची जय्यत तयारी


शारदीय नवरात्र उत्सवासाठी दुर्गामाता मूर्ती घडविण्याची जय्यत तयारी

पन्हाळा प्रतिनिधी :शंकर कुंभार- आगामी शारदीय नवरात्र उत्सवाची चाहूल लागल्याने कुंभार बांधवांकडून दुर्गा मातेसह विविध देवींच्या मूर्ती घडविण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील कुंभार बांधव पारंपरिक पद्धतीने मूर्ती साकारत आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत चालणाऱ्या या श्रमांमुळे कुंभारवाड्यांत उत्सवाचे आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.दुर्गा माता, भवानी, काळुबाई अंबाबाई यांच्या मूर्तींना खास आकर्षक रूप, नयनरम्य भाव, तसेच आकर्षक रंगसंगती यावर विशेष भर देण्यात येत आहे. मूर्ती घडवताना देवीचे तेजस्वी व दिव्य रूप अवतरल्याचे साक्षात दर्शन भक्तांना होईल, याची काटेकोरपणे काळजी कारागीर घेत आहेत.गावागावांतून, शहरांतून तसेच परिसरातील दुर्गा माता भक्तगण कुंभार बांधवांकडे मूर्तींसाठी आगाऊ नोंदी करून ठेवत आहेत. लहान आकारापासून ते मोठ्या देखण्या मूर्तींपर्यंत विविध प्रकारची निर्मिती सुरू असून शेवटच्या टप्प्यात रंगरंगोटी, अलंकरण, दागदागिने बसविण्याचे काम श्री स्वामी वरद राज आर्ट्स पी डी पाटील नगर कराड सातारा जिल्हा मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष मा श्री मनोज कुंभार भैया ‘ यांच्या कलेचे कौतुक होत आहेनवरात्र उत्सवात देवीच्या आराधनेला भक्त मोठ्या भक्ती भावाने श्रद्धेने सामील होतात. त्यामुळे मूर्ती घडवताना भक्तीभाव, परंपरा व कलात्मकता यांचा सुंदर संगम साधला जात आहे. कुंभार बांधवांचे हे श्रम आणि कला यामुळेच गावोगावच्या नवरात्र उत्सवाला तेज व झळाळी रंगत येणार आहे


Translate »
error: Content is protected !!