ताज्या घडामोडी

श्री संत मसु बुरुंगले महाराज पालखी सोहळ्यास २२ जुलैपासून प्रारंभ


श्री संत मसु बुरुंगले महाराज पालखी सोहळ्यास २२ जुलैपासून प्रारंभ

समर्थ शिवाजी महाराज बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र घेरडी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी;
मार्गावर स्वागत, महाप्रसाद, कीर्तन व प्रवचनाचे आयोजन
.प्रतिनिधी शशिकांत कोळी

इंचगिरी संप्रदाय ( घेरडी फड) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री संत मसु बुरुंगले महाराज पालखी रथ आपटी पायी दिंडी सोहळ्याला बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र घेरडी येथून उत्साहात प्रारंभ होत आहे. श्री संत मसु बुरुंगले महाराजांच्या पादुकांचे पूजन करून दुपारी ३.०० वाजता पालखी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
यंदाच्या पालखी सोहळ्यात संपूर्ण मार्गावर विविध गावांतील ग्रामस्थ, वारकरी मंडळे आणि भक्तांच्या वतीने स्वागत, चहा-नाश्ता, महाप्रसाद तसेच कीर्तन-भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होण्याची शक्यता असल्याने आयोजकांनी नियोजन पूर्ण केले आहे.
मार्गावरील गावांमध्ये भक्तिमय वातावरण
पहिल्या दिवशी , पारे, वेताळवाडी, लोखंडे मळा, टाकळी माळकरवाडी, चिचोली व दिवाणवस्ती येथे पालखीचे स्वागत होणार असून भाविकांसाठी चहा- नाष्टा व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री दिवाणवस्ती येथे पालखीचा मुक्काम असेल.
दुसऱ्या दिवशी शिरशी , लोखंडे शिंगाडे तसेच श्रीनाथ महाराज मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तिसऱ्या दिवशी गुंजेगाव येथे स्वागत समारंभ, निरूपण, प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
एकादशीला पंढरपुरात सांगता
शनिवार, दि. २५ जुलै रोजी सकाळी चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, हरिपाठ व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनाने पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित राहणार .
२२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घेरडी येथून पालखी प्रस्थान
मार्गावर अनेक ठिकाणी स्वागत, चहा-नाश्ता व महाप्रसाद
गुंजेगाव येथे निरूपण, प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम
२५ जुलै रोजी पंढरपूर येथे चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिणा
वैद्यकीय सेवा व वाहन व्यवस्थेची विशेष सोय
वारकरी परंपरा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा श्री संत मसु बुरुंगले महाराज पालखी सोहळा हा परिसरातील श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण उत्सव मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो वारकरी “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.

Translate »
error: Content is protected !!