माणगंगा परिवारतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव
माणगंगा परिवारतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव
माणगंगा परिवारतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव
सांगोला : रवीराज शेटे – समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देत अनेक पिढ्यांना ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची शिकवण देणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सांगोला यांच्या वतीने सांगोला व पंचक्रोशीतील माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन तसेच प्राथमिक शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षिका, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कार्यगौरव व कृतज्ञता सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष तथा सांगोला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मा. श्री. नितीन आबासाहेब इंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नेते तथा माजी आमदार मा. दत्तात्रेय सावंत साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. श्री. विठ्ठलराव शिंदे सर तसेच माजी शिक्षणाधिकारी मा. श्री. तानाजीराव घाडगे साहेब उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना मा. नितीन इंगोले यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत समाज घडविण्यातील त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे सांगितले.यावेळी माजी शिक्षणाधिकारी मा. श्री. तानाजीराव घाडगे साहेब यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत शिक्षकांच्या योगदानाचा गौरव केला व उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात मा. दत्तात्रेय सावंत साहेब यांनी शिक्षकांचा सन्मान करणारा हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे सांगत माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजात शिक्षकांविषयीचा आदर अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत समाजहिताचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.यावेळी उपस्थित सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेच्या चेअरमन सौ. अर्चनाताई इंगोले, व्हाईस चेअरमन श्री. सुखदेव रंधवे, संचालक श्री. सचिन इंगोले, श्री. विजय वाघमोडे, श्री. विवेक घाडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अक्षय मुढे तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सन्मानित मान्यवरांमध्ये श्री. तानाजी नामदेव खंडागळे, श्री. हरीबा नामदेव कोळेकर, श्री. राजीव सूर्यकांत पाटील, श्री. संभाजीराव भगवान शिंदे, श्री. रघुनाथ आप्पा फुले, श्री. प्रदीप शिवराम कुलकर्णी, श्री. तानाजी रामचंद्र माने, श्री. विठ्ठल बापू सोसे, श्री. बिभीषण शिवाजी माने, श्री. दिलीप रावसाहेब मोरे, श्री. जालिंदर अर्जुन राऊत, श्री. उत्तम केराप्पा सोनलकर, श्री. दत्तात्रय महादेव इंगवले, श्री. दिगंबर रामहरी कुंभार, श्री. सिद्धेश्वर रामचंद्र काळे, श्री. विष्णू नामदेव राऊत, डॉ. बबन सिद्राम गायकवाड, श्री. दशरथ सौदागर दिघे, श्री. बिरा नामदेव दिवसे, श्री. बाळासाहेब गंगाधर मेत्रे, श्री. शिवाजी नारायण पाटील, श्री. रावसाहेब महादेव लेंडवे, श्री. चंद्रकांत नारायण लिगाडे, सौ. अरिफा मोहम्मद शेख, श्री. दत्तात्रय उद्धवराव पांचाळ, श्री. दशरथ दामोदर जाधव, श्री. तुकाराम कृष्णा काशीद, श्री. चंद्रकांत लक्ष्मण इंगळे, श्री. भास्कर सिद्धेश्वर महाजन, श्री. हमजू काका मुलाणी, श्री. नीलकंठ विठ्ठल लिंगे, श्री. संजय महालिंग पैलवान, श्री. बाळकृष्ण ज्ञानू कोकरे, श्री. सिद्धेश्वर रंगनाथ नवले, श्री. रमेश मच्छिंद्र पवार, श्री. वसंताप्पा बाबर नवले, श्री. दत्तात्रय कुंडलिक बयाजी, श्री. ज्ञानू मोठे, श्री. सलीम दस्तगीर मुलाणी, श्री. प्रकाश बाबुराव पैलवान, श्री. संजय बसवेश्वर महाजन, श्री. भारत श्रीरंग मिटकरी, सौ. शेवंता नारायण गायकवाड, श्री. भीमराव ज्ञानेश्वर पाटील, श्री. देवरा शंकरराव पोकळे, श्री. खंडू नारायण गाडेकर, सौ. संगीता जगन्नाथ शिंदे, श्री. सुनील दत्तात्रय बिवरे, डॉ. सिकंदर मुसा मुलाणी, श्री. बापूराव तात्यासाहेब बाबर जाधव, श्री. नागेश भीमराव चंद्रकांत शिंदे, सौ. सय्यदा शहिदा गुंडू, सौ. कांताबाई भगवान इंगवले, श्री. मारुती दत्तू देशमुख, मा. सावंत सर, श्री. प्रकाश मामणे सर, मा. आजबे गुरुजी, मा. कोकरे सर, मा. गडदे साहेब, मा. माळी सर, मा. फिरोज आत्तार सर, मा. तांबोळी सर, श्री. जगताप सर, सौ. शशिकला मधुकर बाबर आणि श्री. विठ्ठलपंत वामनराव शिंदे यांचा समावेश होता.सत्कारमूर्तींच्या वतीने श्री. हमजू मुलाणी सर, श्री. रमेश पवार सर, सौ. संगीता शिंदे मॅडम आणि श्री. चंद्रकांत इंगळे सर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभवांना उजाळा देत या सन्मानाबद्दल आयोजक व संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक श्री. विवेक घाडगे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. जितेश कोळी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक सोसायटीचे संचालक मा. श्री. दत्तात्रेय कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.ज्ञानदानाच्या महान कार्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या गुरुजनांचा सन्मान करून माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, शिक्षकवर्ग आणि नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.