कौतुकास्पद – तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेज वारणानगर येथे मा. श्री. पंडितराव जयराम नलवडे यांची कार्यालय अधीक्षकपदी निवड
तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेज वारणानगर येथे मा. श्री. पंडितराव जयराम नलवडे यांची कार्यालय अधीक्षकपदी निवड
तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेज वारणानगर येथे मा. श्री. पंडितराव जयराम नलवडे यांची कार्यालय अधीक्षकपदी निवड
मोहरे गावातून कौतुकाचा वर्षाव – वारणानगर (ता. पन्हाळा) येथील तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजमध्ये वारणा उद्योग शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष व पन्हाळा शाहूवाडी तालुक्याचे आमदार मा विनयरावजी कोरे साहेब व सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे शिक्षणाचा महामेरू शिक्षण पंढरी म्हणून संबोधले जाणारे वारणानगर या नगरीमध्ये वारणा विभाग शिक्षण मंडळ सचिव माश्री करर्जिनी सर यांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळा संपन्न मोहरे ता पन्हाळा या गामीण भागाचे सुपुत्र मोहरे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य मा. श्री. पंडितराव जयराम नलवडे यांची कार्यालय अधीक्षक पदावर नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र कौतुक होत असून, मोहरे ता पन्हाळा गावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मा. नलवडे सर हे आपल्या सातत्यपूर्ण प्रामाणिक सेवेमुळे व कर्तव्यनिष्ठतेमुळे ओळखले जातात. त्यांनी अनेक वर्षे शैक्षणिक प्रशासन क्षेत्रात अनुभव संपादन केले असून, विद्यार्थ्यांच्या व सहकाऱ्यांच्या अडचणी समजून घेणारा अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे त्यांच्या या यशामध्ये कुटुंबीय, शिक्षक, मार्गदर्शक व सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा असून, मोहरे गावातील विविध मान्यवरांनी आणि स्थानिक शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.या निवडीमुळे मोहरे गावाचा नावलौकिक आणखी वाढला असून, तरुणांना प्रेरणा देणारा हा एक आदर्श ठरतो.