महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभागाचे विभाग नियंत्रक श्री सुनील भोकरे साहेब यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन
दुःखद वार्ता
दुःखद वार्ता…..
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभागाचे विभाग नियंत्रक
श्री.सुनील भोकरे साहेब यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन
सांगली (प्रतिनिधी – पांडुरंग हातेकर) :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सांगली विभागाचे कार्यक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. सुनील भोकरे साहेब यांच्या मातोश्री श्रीमती शेवंताबाई भोकरे (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भोकरे कुटुंबियांसह परिचितवर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
शेवंताबाई भोकरे या धार्मिक व संस्कारशील स्वभावाच्या होत्या. त्यांना आयुष्यभर सामाजिक बांधिलकी व कुटुंबवत्सलतेचा वारसा जपणाऱ्या महिला म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या सहवासातून अनेकांना प्रेम, समर्पण आणि आदर्श जीवनमूल्यांचे धडे मिळाले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच सांगली विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्ग, विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भोकरे कुटुंबीयांवर आलेल्या या दुःखद प्रसंगी राजमुद्रा इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड सर्व्हिसेस, सांगली विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी बंधूभगिनींनीही आपले मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
या कठीण प्रसंगी ईश्वर भोकरे परिवारास धैर्य व सामर्थ्य देवो, आणि स्व.शेवंताबाई भोकरे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच सर्वांच्या मनातील प्रार्थना.
रक्षा विसर्जन विधी कार्यक्रम दि. १९ ऑक्टोबर (रविवार) रोजी सकाळी सांगली येथे वैकुंठ भूमीत पार पडणार आहे.




