प्रसिद्ध उद्योगपती बाबुराव शेठ पटण शेट्टी यांचे निधन.
प्रसिद्ध उद्योगपती बाबुराव शेठ पटण शेट्टी यांचे निधन..
नाझरे प्रतिनिधी – रवीराज शेटे
नाझरे ता. सांगोला येथील वीरभद्र मंदिराचे परमभक्त व जत जि. सांगली येथील प्रसिद्ध उद्योगपती बाबुराव शेठ अण्णाप्पा पट्टणशेट्टी यांचे गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता जत येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षी 81 होते.
जत येथील नारळाचे ते मोठे व्यापारी होते. त्यांच्या निधनानंतर जत बाजारपेठेत दुकाने बंद ठेवून दुःखवटा पाळण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम जत येथे शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घरगुती पद्धतीने होईल असे नातेवाईकांनी सांगितले. प्रसिद्ध उद्योगपती अनिल शेठ पटन शेट्टी यांचे ते वडील होते.




