बोरपाडळे ते अमृतनगर रस्त्यावरील खड्डे त्वरित भरण्याची दलित महासंघाची मागणी
बोरपाडळे ते अमृतनगर रस्त्यावरील खड्डे त्वरित भरण्याची दलित महासंघाची मागणी
पन्हाळा प्रतिनिधी : शंकर कुंभार
बोरपाडळे ते अमृतनगर या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून सर्वत्र मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात तर या खड्ड्यांमुळे प्रवाशांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना व वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताचा धोका कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे.या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने जोरदार मागणी करण्यात आली दलित महासंघ राज्य उपाध्यक्ष मा श्री पोपटराव लोंढे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली वारणानगर येथे आमदार डॉ विनय रावजी कोरे यांची दलित महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन रस्त्या संदर्भात समस्या मांडल्या यावेळी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष मा पेत्रस गायकवाड कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री सागर लोंढे श्री चंद्रकांत महापुरे तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होतेसध्या बोरपाडळे ते अमृत नगर मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर अपघात घडत आहेत या रस्त्याच्या संदर्भात वारंवार मागणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास दलित महासंघ रस्ता रोको करणार असल्याचे राज्य उपाध्यक्ष मा श्री पोपटराव लोंढे यांनी सांगितले दरम्यान बोरपाडळे ते अमृत नगर रस्त्या संदर्भात माननीय आमदार विनय रावजी कोरे यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱयाशी संपर्क करून रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे भरून त्वरीत घ्यावेत तसेच प्रवाशांना कोणताही त्रास होईल याची खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या या निवेदनावर जिल्हा संघटक गणेश धनवडे युवक जिल्हाध्यक्ष पेत्रस गायकवाड युवक कार्याध्यक्ष सागर लोंढे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत महापुरे यांच्या स्वाक्षरी आहेत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी महासंघाचे पदाधिकारी यांनी केली.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शाळकरी मुलांची वाहने उलटण्याचा धोका तर आहेच, शिवाय रुग्णांना दवाखान्यात पोहोचविताना विलंब होण्याचा संभव असल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.या मागणीपत्रावर दलित महासंघ पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या करून प्रशासनाला तातडीचे लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.




