ताज्या घडामोडी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य शासनाच्या विरोधात तावडे हॉटेल कोल्हापूर येथे जोरदार निदर्शने


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य शासनाच्या विरोधात तावडे हॉटेल कोल्हापूर येथे जोरदार निदर्शने

पन्हाळा प्रतिनिधी शंकर कुंभार – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू साहेब व संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या सूचनेनुसार, उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सह संपर्कप्रमुख विजयराव देवणे, राज्य संघटक नवेज मुल्ला, चंगेज खान पठाण, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, रविकरण इंगवले, सुनील शिंगे, वैभव उगळे, सह संपर्कप्रमुख हाजी असलम सय्यद, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलताई चव्हाण, युवा सेना जिल्हाप्रमुख स्वप्निल मगदूम आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते कोल्हापूर येथील तावडे हॉटेल चौकामध्येराज्य शासनाच्या वादग्रस्त व कलंकित मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. भ्रष्टाचारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन उत्स्फूर्त व जोशपूर्ण वातावरणात पार पडले. पक्षनेते व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

Translate »
error: Content is protected !!