ब्रेकिंग न्यूज

सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार


सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार
सांगोला (प्रतिनिधी):  शशीकांत कोळी  – महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ व सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ सलग सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळाच्या वतीने नुकताच सांगोला येथील विद्यार्थी प्रशालेत गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात सांगोला तालुक्यातील नव्याने नियुक्त झालेले गणित शिक्षक, पदवीधर मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांचाही गौरव करण्यात आला.
तसेच जिल्हास्तरावरील आदर्श गणित शिक्षक, इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत गणित विषयात प्रथम क्रमांक मिळविणारे सांगोला तालुक्यातील ५७ विद्यार्थी, इयत्ता दहावी गणित प्रज्ञा परीक्षेत राज्यस्तर प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेले ३८ विद्यार्थी तसेच इयत्ता पाचवी गणित प्रज्ञा परीक्षेत राज्यस्तर प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेले ११ विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष दिलीप नदाफ यांनी केले. यावेळी सांगोला विदयामंदिर प्रशालेचे प्राचार्य चारुदत्त जगताप, जिल्हा गणित मंडळाचे अध्यक्ष संजय भस्मे, मुख्याध्यापक के. पी. देशमुख तसेच विद्यार्थी मनोगतातून कुमारी समृद्धी माळी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांनी गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी गणित विषयात सातत्यपूर्ण अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन करावे, असे आवाहन केले.सूत्रसंचालन आनंद खंडागळे, छायाचित्रण एकनाथ फटे यांनी केले. उपस्थितांचे आभार मंडळाचे सचिव अण्णासाहेब गायकवाड यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवाजी चोगुले, माजी जिल्हाध्यक्ष नीलकंठ लिंगे, परीक्षा प्रमुख दिनेश सुरवसे, शरद थोरात तसेच सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.

Translate »
error: Content is protected !!