प्रतिनिधी – फिरोज मुल्ला भिलवडी – महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्था व पालक यांच्या बाबतीत अन्यायकारक निर्णय घेऊन बहुजनांची अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणण्याचे काम सुरू आहे या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ठीक दहा वाजता सामूहिक रजा शाळा बंद आंदोलन व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे या आंदोलनातील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत१) पवित्र पोर्टल रद्द करून शिक्षक पद भरतीचा अधिकार पुन्हा संस्थाचालक यांना देण्यात यावा२) राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी३) 15 मार्च 2024 ची संच मान्यता जीआर तात्काळ रद्द करावा४) शिक्षकावरील बी एल ओ एस आय आर तसेच इतर अशैक्षणिक कामे तात्काळ हटवून शिक्षकांना केवळ अध्यापनाचे काम करू द्यावे तसेच कार्यरत शिक्षकासाठी टीईटी परीक्षा याची सक्ती रद्द करण्यात यावी तरी सांगली जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळातील शिक्षकांनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे जाहीर आव्हान सांगली शैक्षणिक व्यासपीठ सर्व संघटना यांच्यामार्फत करण्यात आले आहे