ब्रेकिंग न्यूज

सरकारविरोधात शिक्षकांचा आक्रमक पवित्रा उद्या राज्यव्यापी ‘शाळा बंद’ची हाक शिक्षक संघटनांचा एल्गार; अशैक्षणिक कामांतून मुक्ततेची प्रमुख मागणी


सरकारविरोधात शिक्षकांचा आक्रमक पवित्रा
उद्या राज्यव्यापी ‘शाळा बंद’ची हाक
शिक्षक संघटनांचा एल्गार; अशैक्षणिक कामांतून मुक्ततेची प्रमुख मागणी

सांगोला प्रतिनिधी : शशीकांत कोळी – शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शिक्षक संघटनांनी दि. ९ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी ‘शाळा बंद’ आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी पाठिंबा जाहीर केला असून राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच इतर अशैक्षणिक कामांवर वारंवार नियुक्त केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून पूर्णपणे मुक्त करून केवळ अध्यापनाची जबाबदारी द्यावी, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.राज्यव्यापी आंदोलनामुळे अनेक शाळांमधील शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून शासनाने शिक्षकांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी केली आहे.शिक्षण विभागाचे निर्देश३० जुलैपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात मतदारयादी विशेष पुनरीक्षण मोहिमेमुळे बीएलओ शिक्षकांना वेळ मिळावा, यासाठी ३० जुलैपर्यंत शाळा शक्यतो सकाळच्या सत्रात भरविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.मात्र, शिक्षक संघटनांनी भूमिका ही तात्पुरती उपाययोजना असून शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून कायमस्वरूपी मुक्तता मिळावी, अशी मागणी कायम ठेवली आहे.
आंदोलनातील प्रमुख घोषणा
शिक्षकांवर अन्याय थांबवा!
अशैक्षणिक कामांतून मुक्त करा!!
शिक्षक एकता – जिंदाबाद!

Translate »
error: Content is protected !!