ताज्या घडामोडी

डॉ. सोनल शशिकांत भुंजे यांना अर्थशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्राप्त


डॉ. सोनल शशिकांत भुंजे यांना अर्थशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्राप्त

सांगोला/ रवीराज शेटे

सोलापूर – डॉ. सोनल शशिकांत भुंजे यांनी अर्थशास्त्र विषयात पीएचडी पदवी संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांनी “Trends in use of agricultural inputs and its impact on agricultural productivity in Western Maharashtra” (पश्चिम महाराष्ट्रातील कृषी निविष्ठांच्या वापराचा कल आणि त्याचा शेती उत्पादकतेवर होणारा परिणाम) या विषयावर सखोल संशोधन केले. ही पदवी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथून प्राप्त केली असून त्यांच्या संशोधनाला तज्ज्ञांकडून प्रशंसा मिळाली आहे. त्यांनी आपले हे संशोधन डॉ. एस. एन. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. ११ मार्च २०२६ रोजी विद्यापीठात झालेल्या मौखिक परीक्षेत (Viva-Voce) त्यांनी आपल्या प्रबंधाचे यशस्वी सादरीकरण केले. त्यानंतर ६ एप्रिल २०२६ रोजी त्यांना अधिकृतपणे ही पदवी प्रदान करण्यात आली.या यशामागे त्यांच्या आई-वडील सौ सुनिता व श्री. शशिकांत भुंजे व भाऊ श्री. सुशांत यांचे मोलाचे पाठबळ त्यांना लाभले. तसेच त्यांचे पती श्री. ऋषिकेश गुळमिरे व कुटुंबीयांचाही या यशात मोठा वाटा आहे.सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष मा.प्रा.पी. सी. झपके सर, उपाध्यक्ष मा. ता. ना. केदार साहेब, सचिव मा.ॲड. उदय घोंगडे, उपसचिव मा.साहेबराव ढेकळे, खजिनदार मा.नागेश गुळमिरे सर्व संस्था पदाधिकारी व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले आणि प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.सोनल भुंजे यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या कार्यामुळे कृषी क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय घेण्यास तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यास मदत होणार आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Translate »
error: Content is protected !!