ताज्या घडामोडी

गणेश नाईक विद्यामंदिर व कै मातोश्री मलकावा हणमंतप्पा बिराजदार पाटील प्रशाला रत्नमंजरी सोसायटी जुळे सोलापूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी आली


गणेश नाईक विद्यामंदिर व कै मातोश्री मलकावा हणमंतप्पा बिराजदार पाटील प्रशाला रत्नमंजरी सोसायटी जुळे सोलापूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी आली

सोलापूर – सिद्धांत बाबरे
गणेश नाईक विद्यामंदिर येथे बसवेश्वर महाराज जयंती कार्यक्रम साजरी करण्यात आली सदर प्रसंगी दशरथ वडतीले जेष्ठ पत्रकार अध्यक्ष बुरुड समाज सोलापूर आणि सिद्धांत बाबरे शहर संयोजक विवेक विवेक विचार मंच , प्रीती उडाणशिव सल्लागार ( ITI ) आमने साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी भांजे सर, गंगाधर पाटील ,दसगोंडा सर, नागेश कुंभार सर शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार मॅडम व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवशरण अण्णा बिराजदार पाटील उपस्थित होते.सदर प्रसंगी श्री दशरथ वडतीले सरांनी विद्यार्थ्यांनी गायलेले बसवेश्वराचे वचन ऐकून शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच नागेश कुंभार सरांनी आपल्या मधुर वाणीने बसवेश्वर महाराजांचे वचन सादर केले , सिद्धांत बाबरे यांनी आपल्या मनोगतामध्ये संविधानाचे महत्त्व या विषयावर भाष्य केले आणि संविधानाची उद्देशिकाची फ्रेम विद्यालयास भेट दिली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले शाळेचा परिसर स्वच्छ विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले शिस्त शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करतात हे भाषणातून व्यक्त केले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील यांनीही आपल्या भाषणातून महात्मा बसवेश्वर यांचे विचार आचार आणि आपल्या वचनातून दिलेले संदेश आजही आपण अनुकरण करतो आणि त्याप्रमाणे वागतो सदर प्रसंगी विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले शिक्षकांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुमार हिरेमठ सर यांनी केले व आभार सिद्धेश्वर पाटील यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांची सहकार्य लाभले

Translate »
error: Content is protected !!