नाझरे येथील प्रिती सुतार यांना राज्यस्तरीय गावगाडा पुरस्कार जाहीर
नाझरा – रवीराज शेटे- प्रिती बाबासो सुतार यांना विश्वकर्मा तरुण मंडळ, वडशिवणे (ता. करमाळा) यांच्या वतीने कला व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय गावगाडा पुरस्कार जाहीर झाला आहे.सुतार या आरी वर्क (एम्ब्रॉयडरी), ब्लाऊज डिझाईनिंग, मोत्यांचे दागिने तयार करणे तसेच चित्रकला व पेंटिंग या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी सांगोला व पुणे येथे संबंधित व्यावसायिक शिक्षण घेतले आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.