ब्रेकिंग न्यूज

बलवडी येथील मा. सरपंच शिवाजीराव (दादा) लिगाडे सरकार यांचे निधन


बलवडी येथील मा. सरपंच शिवाजीराव (दादा) लिगाडे सरकार यांचे निधन

नाझरे प्रतिनिधी – रवीराज शेटे
बलवडी ता. सांगोला येथील माजी सरपंच, सोलापूर जिल्हा माजी होमगार्ड प्रमुख शिवाजीराव दादा नानासो लिगाडे यांचे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता वर्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 82 होते. मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे ते मामा होते.युवा नेते मनोज लिगाडे यांचे ते वडील होते तर युवा नेते अमर दादा व ॲडव्होकेट सत्यजित यांचे ते चुलते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम सोमवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता बलवडी ता. सांगोला येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

Translate »
error: Content is protected !!