ब्रेकिंग न्यूज

सांगोल्याच्या राजकारणात मोठी पोकळी: माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांचे निधन निर्भीड नेतृत्व हरपले – शहरावर शोककळा


सांगोल्याच्या राजकारणात मोठी पोकळी: माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांचे निधन; निर्भीड नेतृत्व हरपले – शहरावर शोककळा

सांगोला: शंकर काळे – सांगोला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व निर्भीड नेतृत्व म्हणून ओळख असलेले लोकनेते *नवनाथ भाऊ पवार* यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सांगोला तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कार्यकाळाची ओळख:
नवनाथ भाऊ पवार यांनी नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहरातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छता या प्रश्नांवर भर दिला होता. सर्वसामान्य नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी ते कायम तत्पर असायचे. त्यांच्या साधी राहणी, स्पष्टवक्तेपणा व दांडगा जनसंपर्क यामुळे ते सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते. प्रश्नांना थेट भिडणारे निर्भीड नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
श्रद्धांजलीचा सूर:
सोशल मीडियावर नागरिकांनी “भावपूर्ण श्रद्धांजली” वाहिली आहे. _”आपण केलेले सामाजिक कार्य, आपले मार्गदर्शन आणि आपल्या उपक्रमांची प्रेरणा आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरेल. आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन!”_ अशा शब्दांत अनेकांनी भावना व्यक्त केल्या.
_”आपण आमच्या स्मृतीत सदैव राहाल…”_ अशा भावना व्यक्त होत आहेत.
राजकीय-सामाजिक वर्तुळात हळहळ:
नवनाथ भाऊंच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे. अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.नवनाथ भाऊ पवार यांच्या पश्चात संपूर्ण पवार कुटुंबिय आहेत. सांगोला तालुका नवनाथ भाऊंच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना.

सीबीएस न्युज मराठी कडून भावपूर्ण श्रद्धांजली.🙏


Translate »
error: Content is protected !!