कडलास येथील प्रा. आबासाहेब कोळी यांचे निधन
प्रतिनिधी शशिकांत कोळी.- लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंद येथे उच्च माध्यमिक विभागात रासायनशास्त्र या विषयांचे अध्यापन करणारे प्रा. आबासाहेब भिकू कोळी यांचे शनिवारी पहाटे ह्रदय विकाराच्या झटक्याने पंढरपूर येथील रुग्णालयात निधन झाले.प्रा. कोळी हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. गेली 10 वर्षे ते सोनंद येथे लक्ष्मीदेवी विद्यामंदिरात अध्यापनाचे काम करीत होते. त्यांच्या निधनाने कडलास,सोनंद या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पश्च्यात आई, पत्नी व दोन लहान मुले आहेत.त्यांचे तिसऱ्या दिवसाचा विधी सोमवार 2 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 8-00 वा. कडलास स्मशान भूमी येथे होणार आहे.