धक्कादायक – एस टी महामंडळाच्या नियोजनशुन्य कारभाराचा पारे गावातील विद्यार्थ्यांना फटका ; एसटी बसेस सुरू करण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी – चाँदभैय्या शेख – सांगोला आगार प्रशासनाने पावसाचे व रस्ता दुरुस्ती चे कारण सांगत गेल्या दोन तीन दिवसापासून अचानक एसटी सेवा बंद केल्याने अनेक विद्यार्थ्यांना विनाकारण त्रास सहन करीत शैक्षणिक नुकसान करावे लागत आहे .विशेषतः घेरडी तून हंगिरगे मार्गे पारे गावाला जाण्यासाठी पर्याय मार्ग असताना कामचुकार कर्मचाऱ्यांना सांगण्यावरून एसटी सेवा बंद करण्यात आली .त्यामुळे तत्काळ हंगिरगे मार्गाने पारे गावाला पुन्हा एसटी सेवा सुरू करावी अशी मागणी पालकांतून पुढे येत आहे .पावसाचे आणि रस्ते चे कारण पुढे करीत गेल्या चार पाच दिवसापासून पारे गावाकडे येणाऱ्या सर्व एसट्या बंद करण्यात आल्या आहेत .अचानक एसटी सेवा बंद केल्याने या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यात अडचणी येतात त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे आणि खराब हवामानामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना चालत जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे .विशेषतः शाळा आणि स्थानिक प्रशासन यांनी पावसाच्या अंदाजानुसार विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे प्रवासाची व्यवस्था करण्याची योजना आखावी अशी मागणी पुढे येत आहे .ग्रामीण भागातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परीक्षा तोंडावर आल्याने शाळेला दांडीही मारता येत नसल्याने सांगोला तालुक्यातील अतिदुर्गम पारे गावातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी दररोज सात ते आठ किलोमीटरच पायपीट करत शाळा गाठत आहेत.तालुक्यातील जवळा घेरडी सांगोला या ठिकाणी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा तसेच तांत्रिक अभियांत्रिकी महाविद्यालये असून पारे डिकसळ नराळे या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत.मात्र सांगोला आगारच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.विशेषतःएसटी पासमध्ये सवलत असल्याने विद्यार्थी एसटीने प्रवास करून महाविद्यालय, शाळा गाठतात. मात्र एसटी च्या नियोजन शुन्य कारभारामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, खासगी वाहनचालक अवाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची वाहतूक करत आहे. एवढे पैसे देणे विद्यार्थ्यांना शक्य नसल्याने ते चालत सात ते आठ किलोमीटरची पायपीट करून शाळा, महाविद्यालय गाठत आहेत.त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्तृत्व दक्ष अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा एसटी सेवा सुरळीत करावी अशी मागणी पुढे येत आहे .