मा. मंत्री ॲड आदरणीय आशिष शेलार साहेब यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न
या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती शिराळा तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय श्री सत्यजित शिवाजीराव देशमुख साहेब तसेच विधान परिषदेचे आमदार आदरणीय श्री सदाभाऊ खोत तसेच भाजप जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री सम्राट महाडिक बाबा त्याचबरोबर सातारा जिल्हा भाजप हिंदू परिषद अध्यक्ष आदरणीय श्री विक्रम पावसकर तसेच विविध सामाजिक, धार्मिक तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेलार साहेबांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सत्कारमंचावर मान्यवरांनी पुष्पहार, शाल-श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन मंत्री महोदयांचा सत्कार केला.त्याचबरोबर सांगली जिल्हा मूर्तिकार संघटना अध्यक्ष श्री सुभाष कुंभार गिरजवडे तसेच मूर्तिकार संघटनेचे 200 हून अधिक मूर्तिकार व पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आदरणीय शेलार साहेबांना गणरायाची मूर्ती भेट देऊन भव्य दिव्य फटाक्याची आतिश बाजी करून यथोचित्त सत्कार करण्यात आला त्यावेळी आपल्या मनोगतात बोलताना मा. मंत्री ॲड. आशिष शेलार साहेब म्हणाले की, “धार्मिक भावना व परंपरेशी निगडीत असलेल्या गणेशोत्सव व दुर्गोत्सवांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. न्यायालयीन स्थगितीमुळे पारंपरिक मूर्तींसह सणोत्सव साजरे होऊ शकतील, मात्र पर्यावरण रक्षणाचे भान ठेवून उत्सव साजरा करणे हेही आपले कर्तव्य आहे.”कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थानिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले तर आभारप्रदर्शन सामाजिक कार्यकर्त्यांनी मानले. संपूर्ण . शिराळा परिसरातील मान्यवर, मंडळांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या यथोचित सत्कार सोहळ्यामुळे परिसरात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गणेशोत्सव पूर्वीप्रमाणेच भक्तिभावात साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.