ताज्या घडामोडी

शक्तीपीठ रस्त्यामुळे शेतकरी देशोधडीला – दादासो वाघमोडे


शक्तीपीठ रस्त्यामुळे शेतकरी देशोधडीला – दादासो वाघमोडे

बलवडी, वझरे येथील मोजणी शेतकऱ्यांनी थांबवली

सांगोला प्रतिनिधी
शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक काळया, कसदार जेमिनी यामध्ये जाणार असल्याने शेतकऱ्यावर अन्याय होत आहे व शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त होत आहे व या रस्त्याची मागणी नसताना मार्ग करणे व पर्यायी मार्ग असताना रेटून मोजणी करण्याचा वारंवार घाट प्रशासन घालित आहे व यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे व त्यामुळे शक्तिपीठ रद्द करणे गरजेचे आहे व त्यामुळे बलवडी व वझरे येथील शेतकऱ्यांनी मोजणी थांबवली असे शेतकरी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष दादासो वाघमोडे यांनी सांगितले.
शेतकरी शक्तीपीठ विरोधात न्यायालयात जाणार.. – राजू ज्ञानू पाटील शेतकरी..शक्तिपीठ महामार्गासाठी आमची जमीन द्यावयाची नाही असे वारंवार सांगून सुद्धा वझरे, बलवडी येथे मोजणीस पथक दोन वेळा आले व यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे, मागणी नसताना व वजरे येथून चार किमी अंतरावर असलेला नागपूर रत्नागिरी हायवे आहे व या महामार्गास हा मार्ग जोडावा व वारंवार मोजणीस अधिकारी वर्गणी येऊ नये अशी आमची कळकळीची विनंती आहे व शक्तीपीठ विरोधात न्यायालयात शेतकरी जाणार

सदर प्रसंगी बलवडी, वझरे येथील बाधित शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता व एकच जिद्द शक्तीपीठ रद्द असे ठणकावून शेतकरी ने यावेळी सांगितले.


Translate »
error: Content is protected !!