ताज्या घडामोडी

देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत घरगुती जेवण सेवा


देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत घरगुती जेवण सेवा

पन्हाळा प्रतिनिधी :शंकर कुंभार देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. “एक हात मदतीचा” या सामाजिक भावनेतून मोफत घरगुती जेवण सेवा आयोजित करण्यात आली.
माजी मंत्री मा श्री प्रकाश अण्णा आवाडे साहेब तसेच मा आमदार डॉ राहुल आवाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव ता हातकणंगले परिसरातील खाजगी व सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना व त्यांच्यासोबत सेवेसाठी असणाऱ्या नातेवाईकांना जर जेवणाची अडचण भासत असेल तर त्यांच्यासाठी मोफत घरगुती जेवणाचा डबा थेट रुग्णालयात पोहचवण्यात येईल हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू राहणार आहे त्यासाठी संपर्कप्रमुख मा श्री वैभव हिरवे मामा यांच्याशी मोबा नं 9158789696. 8449969696 या मोबाईल वरती गरजूंनी संपर्क साधावा किंवा भारतीय जनता पार्टी कार्यालय पेठ वडगाव लाटवडे रोड वारणा बाजार शेजारी संपर्क साधावा या उपक्रमातून एक हात मदतीचा या भावनेने रुग्णू व त्यांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा हा मूळ उद्देश आहे या उपक्रमात गरजूंना, रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वादिष्ट व पौष्टिक जेवणाचे वितरण करण्यात येईलउपक्रमाचे उद्घाटन स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी सांगितले की, “पंतप्रधान मोदी साहेबांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घेऊन सेवा आणि समाजकार्य हीच खरी राष्ट्रसेवा आहे”.कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आले असून या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी “एक हात मदतीचा” या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत, अशा प्रकारच्या सामाजिक कार्यामुळेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य अधिक अर्थपूर्ण ठरते असे मत व्यक्त केले.

Translate »
error: Content is protected !!