पन्हाळा प्रतिनिधी शंकर कुंभार कु. पायल विलास नलवडे या विद्यार्थिनीने B . pharmacy सध्या Master of Degree ( M pharmacy ) चे शिक्षण घेत 13 सप्टेंबर 2025 रोजी औषधशास्त्र विभागातून “विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे यंत्राच्या विकासाला व वैद्यकीय औषधाच्या विकासाला चालना मिळाली” या विशेष आवर्तनाचे प्रकाशन अलीकडेच दिमाखात संपन्न झाले.इंटरनॅशनल रिसर्च जनरल ऑफ मुंबई यांच्या औषधाच्या विभागातून या पहिल्या आवृत्तीचे पुस्तक प्रकाशित झाले आहे ह्या आवर्तीचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रियंका मोहिते मॅडम assistant professor यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले कु पायल विलास नलवडे ह्या विद्यार्थिनीने पहिले पुस्तक “संघर्षाचा आधार तू . हा काव्यसंग्रह 2024 यावर्षी बाळासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी यांनी प्रकाशित केले हा काव्यसंग्रह मा श्री उमेश मल्हारराव घुळे (उप आयुक्त जिल्हा जात पडताळणी विभाग व समाज कल्याण विभाग कोल्हापूर )यांना अर्पण केला या आवर्ती साठी मार्गदर्शक मा श्री जयसिंग निवृत्ती पाटील सहाय्यक शिक्षक मोहरे हायस्कूल मोहरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभलेया प्रकाशन सोहळ्याला शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील गेल्या काही दशकातील झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे उद्योग, शेती, वैद्यकीय व दैनंदिन जीवनात क्रांती घडून आली आहे. यंत्राच्या विकासामुळे मानवी श्रमाची बचत होऊन उत्पादनक्षमतेत वाढ झाली असून, वैद्यकीय औषधांच्या संशोधनामुळे आज अनेक गंभीर आजारांवर प्रभावी उपचार शक्य झाले आहेत, हे या आवर्तनात सविस्तरपणे मांडले आहे.अशा प्रकारच्या शैक्षणिक व माहितीपूर्ण आवर्तनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची व विज्ञानाकडे पाहण्याची प्रेरणा निर्माण होते. कु. पायल विलास नलावडे यांनी केलेला हा उपक्रम समाजासाठी मार्गदर्शक असून विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील जागरूकतेसाठी मोठे योगदान आहे, त्यांचे कौतुक केले.प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कु पायल विलास नलावडे या विद्यार्थिनीचा यथोचित्त गौरव सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आला या गुण गौरव सोहळ्यामुळे मोहरे गावात व त्यांच्या घरी आनंदाचे वातावरण झाले आहे