शिवनेरी उद्योग समूह मोहरेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
शिवनेरी उद्योग समूह मोहरेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
पन्हाळा प्रतिनिधी शंकर कुंभार शिवनेरी उद्योग समूह मोहरे यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली. या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून शिवनेरी उद्योग समूह संस्थापक अध्यक्ष मा श्री शिवाजीराव मोरे आप्पा तसेच मोहरे गावचे माजी सरपंच प्राध्यापक मा श्री शिवाजीराव मोहिते सर डे सरपंच माश्री प्रवीण मोरे व मोहरे हायस्कूल मोहरे उपाध्यक्ष मा श्री जे डी पायमल भाऊ ऑडिटर मा श्री कृष्णात कुंभार व मान्यवर ग्रामस्थ, पदाधिकारी व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या अध्यक्षस्थानी शिवनेरी उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव मोरे हे होते. तर स्वागत प्रास्ताविक मा श्री. शिवाजी शिंदे सर यांनी केले. राजश्री शाहू पतसंस्था मोहरे या संस्थेची 31 वी सर्वसाधारण सभा या संस्थेचे चेअरमन माननीय श्री आनंदा बापू शिंदे तसेच व्हा चेअरमन माननीय श्री बाळासो बापू चिरमुरे संस्थेचे चेअरमन यांनी आपल्या मनोगतात संस्थेवर असणारा सभासदांचा दृढ विश्वास त्यामुळे संस्थेचे आज वटवृक्ष झाले आहेअसा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर संस्थेचे मॅनेजर मा श्री भानुदास शेळके यांनी वार्षिक अहवाल वाचन केले संस्थेचे संचालक मा श्री विलास नलवडे तसेच मा श्री दत्तात्रय कुंभार तसेच माननीय श्री अरुण घोंगडे आदी संचालक उपस्थित होते

तसेच शिवनेरी दूध संस्था मोहरे या संस्थेची 30 वि सर्वसाधारण सभा या संस्थेचे चेअरमन मा श्री शिवाजीराव मोरे व व व्हा चेअरमन मा श्री विजयकुमार दत्तात्रय मोहिते पाटील तसेच सर्व कर्मचारी स्टाफ उपस्थित होते त्यावेळी दूध उत्पादकांच्या वरती असणारा दृढ विश्वास आणि दूध संकलन वाढवण्यासाठी या स्पर्धात्मक युगात प्रतिवर्षी गाय दूध तसेच म्हैस दूध यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय असे नंबर काढण्यात येत आहेत त्यामध्ये अनुक्रमे गाय दूध प्रथम क्रमांक दूध उत्पादक श्री रामचंद्र यशवंत शेळके द्वितीय क्रमांक भीमराव शामराव पायमल व तृतीय क्रमांक श्री अजय पांडुरंग झेंडे तसेच म्हैस दुध प्रथम क्रमांक श्री शिवाजी बाजीराव भोसले व द्वितीय क्रमांक श्री लालासो शंकर चौगुले व तृतीय क्रमांक सौ सुरेखा रामचंद्र शेळके यांचा यथचित्त असा सत्कार करण्यात आला प्रति वर्षाप्रमाणे मोहरे हायस्कूल मोहरे या शाळेतील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह एक झाड देऊन सत्कार करण्यात आला तसेच लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये माश्री बाबासो आनंदा पाटील तसेच पूजा जयसिंग नलवडे व अनिकेत आनंदा शिंदे क्लासवन अधिकारी तसेच जीवन सुभाष खवरे क्लास वन अधिकारी त्याचबरोबर पुणे कारागृह महाराष्ट्र पोलीस ओंकार शंकर कुंभार आदी यांचा संस्थेच्या वतीने फेटा शाल श्रीफळ देऊन सत्कार संपन्न झाला
त्याचबरोबर शिवाजी विकास सेवा सोसायटी मोहरे या संस्थेची 29 वी सर्वसाधारण सभा या संस्थेचे चेअरमन मा श्री शिवाजीराव मोरे व्हा चेअरमन मा श्री शिवाजी बापू शिंदे सर तसेच सर्व कर्मचारी स्टाफ उपस्थित होते या तिन्ही संस्थेचे अहवाल वाचन व
त्यावर सभासदांनी समाधान व्यक्त करून मंजूरी दिली.यावेळी उद्योग समूहाने गेल्या वर्षभरात केलेली प्रगती, राबवलेले विविध उपक्रम, तसेच शेतकरी यांना योग्य मार्गदर्शन दिलेसभेत नवीन वर्षासाठी विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी आणखी काही योजना राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.शेवटी आभार प्रदर्शन शुभम मोरे यांनी मानले.ही वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाल्याने सर्व दूध उत्पादक तसेच सभासद ग्रामस्थ यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.संस्थेची सभा अगदी खेळीमेळीत संपन्न झाली




