हिंदवी तरुण मंडळ मोहरे तर्फे सर्व रोग निदान शिबिर संपन्न
हिंदवी तरुण मंडळ मोहरे तर्फे सर्व रोग निदान शिबिर संपन्न
पन्हाळा प्रतिनिधी शंकर कुंभार – हिंदवी तरुण मंडळ मोहरे या मंडळाचे अध्यक्ष मा श्री संदीप कुंभार व उपाध्यक्ष विशाल शिंदे मार्गदर्शक माननीय श्री डे सरपंच प्रवीण मोरे यांच्या वतीने गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत सर्व रोग निदान शिबिर ऑर्किड हॉस्पिटल कोडोली यांच्या मार्फत उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, रक्त तपासणी, मूत्र तपासणी, हाडांचे आजार, स्त्रीरोग तसेच बालरोग यांसारख्या आजारांचे तपासणी केंद्र उभारण्यात आले होते. यावेळी तज्ज्ञ डॉ नुतन पवार मॅडम यांनी सर्व निदान मोफत शिबिराची माहिती दिली त्यावेळी त्या म्हणाल्या आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा हा मलमंत्र जोपासून ऑर्किड हॉस्पिटल च्या माध्यमातून सर्व रुग्णांना महात्मा ज्योतिबा जन आरोग्य मार्फत व आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत सर्व रुग्णांना अगदी मोफत सर्व आजारावर रुग्णांना उपचाराची सोय आर्किट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून सर्वसामान्य रुग्णांना विनामूल्य सेवा देण्याचे उपक्रम हाती घेतली असून सर्व नागरिकांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन दिले. काही रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन केले त्यावेळी उपस्थित सर्व तज्ञ नर्सिंग स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य व शिवनेरी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री शिवाजीराव मोरे आप्पा यांच्या शुभ हस्ते झाले त्यावेळी मोहरे ग्रामपंचायत सरपंच मा श्री प्रदीप डोईफोडे व डे सरपंच मा श्री प्रवीण मोरे त्याचबरोबर माजी सरपंच मा श्री शिवाजीराव मोहिते सर त्याचबरोबर माजी सरपंच माननीय श्री प्रशांत उर्फ आप्पासो शेळके साहेब इंडियन आर्मी मा श्री रमेश मोरे व आरोग्य मित्र श्री अजय भोसले गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक दिवसभर नागरिकांना सुविधा मिळवून देण्यासाठी कार्यरत होते. शिबिरात सुमारे २५० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.हिंदवी तरुण मंडळाच्या यामागचा एकच हेतू”गावातील प्रत्येक कुटुंब निरोगी राहावे हा आमचा उद्देश असून पुढील काळात अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाईल.”शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते, तसेच गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिराचे सूत्रसंचालन मा श्री अशोकराव आभ्रेसर यांनी केले या शिबिरामुळे हिंदवी तरुण मंडळ या मंडळाचे भागाभागात कौतुक होत आहे




