ताज्या घडामोडी

संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित डॉ. दीपक पाटील नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा


संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित डॉ. दीपक पाटील नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा

पन्हाळा प्रतिनिधी : शंकर कुंभार संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित डॉ. दीपक पाटील नर्सिंग इन्स्टिट्यूट, बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथे यंदा गणेशोत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या श्रद्धा-भक्तीने श्री गणरायाचे स्वागत केले.गणपती बाप्पाची आरती, पूजा, नैवेद्य अर्पण करून उत्सवाचा शुभारंभ झाला. या सोहळ्या करीता दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष मा श्री सागर लोंढे व परिसरातील ग्रामस्थ, पालक, तसेच इन्स्टिट्यूटचे शिक्षक-कर्मचारी यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे नियोजन नर्सिंग च्या विद्यार्थी व विद्याथीनीनी अतिशय सुंदर असे केले होते गणरायाच्या आशीर्वादाने संस्थेतील विद्यार्थ्यांना शिक्षणात व सेवाकार्यात उत्तुंग यश मिळावे,” अशी भावना संस्थाध्यक्ष डॉ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य, मा महेश बामणी सर तसेच मॅनेजिंग डायरेक्टर मा डॉ स्मिता पाटील मॅडम सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केले.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याने हा उपक्रम अधिक खास ठरला.या वार्षिक परंपरेतून संस्थेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये श्रद्धा, एकात्मता व सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले.
आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा

Translate »
error: Content is protected !!