चक्क मातीचा गणपती : ४० वर्षांची अखंड परंपरा
पन्हाळा प्रतिनिधी – शंकर कुंभार – गणेशोत्सव म्हटला की बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) व शाडूच्या मूर्तींचा भरपूर कल पाहायला मिळतो. मात्र या सगळ्यांपासून वेगळी अशी एक परंपरा आजही जपली गेली आहे. चक्क नैसर्गिक मातीपासून मूर्ति . मूर्ती कलाकार . माश्री हर्षल कुंभार नेबापूर यांनी घडवलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती ही परंपरा तब्बल ४० वर्षे सुरू असून आजही तेवढ्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने तिचे पालन केले जाते.या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्ती या संकल्पनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे
. पण पन्हाळा तालुक्यातील मोहरे या ग्रामीण भागात शाहू कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मोहिते गल्ली या मंडळाची मातीच्या गणपतीचीच स्थापना करून पर्यावरणपूरकतेचा संदेश देत आहेत. या मंडळाचे अध्यक्ष माश्री वसंत मोहिते व उपाध्यक्ष सर्जेराव पायमल व श्रीची मूर्ती देणगीदार श्री सदाशिव दादू मोहिते मेजर व आज सत्यनारायण पूजा व महाप्रसाद सेवा यांनी दिली बाजारात आकर्षक, रंगीबेरंगी आणि मोठ्या मूर्ती सहज उपलब्ध असल्या तरी परंपरेशी नाळ जोडून ठेवणाऱ्या या उपक्रमाचे खरोखरच कौतुक करावे लागेल.मातीची मूर्ती तयार करणे ही सोपी गोष्ट नाही. मूर्ती घडवण्यासाठी लागणारी माती पाण्यात भिजवून तयार करावी लागते. त्यातून साचा न वापरता हाताने मूर्ती घडवली जाते. . विसर्जनावेळी मूर्ती पाण्यात विरघळून जाते व पर्यावरणाला हानी पोहोचत नाही.या परंपरेला घरातील ज्येष्ठ मंडळींपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. तेथे चक्क मातीच्या मूर्तीची ४० वर्षांची अखंड परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरते. हीच खरी गणेशभक्ती व पर्यावरणसेवा असल्याचे जाणकारांचे मत आहे.या उपक्रमामुळे गावात व परिसरात “मातीचा बाप्पा – सृष्टीचा रक्षक” हा संदेश रुजला असून, येणाऱ्या पिढ्यांसाठी ही परंपरा आदर्श ठरावी अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे