ताज्या घडामोडी

संजीवनी फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर


संजीवनी फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पन्हाळा प्रतिनिधी शंकर कुंभार  बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथे संजीवनी फाउंडेशन बोरपाडळे यांच्या वतीने मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात गावातील नागरिक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला प्रत्येक गावात घरोघरी जाऊन शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, वजन, हाडांची तपासणी तसेच सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी तज्ञ डॉक्टर व परिचारिका यांनी मार्गदर्शन करून आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत सूचना दिल्या.ज्या रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी असल्यास मोफत गुळ जंतूनाशक गोळ्या तसेच रक्त वाढवणारी औषधे मोफत दिली गेली संजीवनी फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना आरोग्य तपासणीची सोय उपलब्ध झाली असून गरजू रुग्णांना मोफत औषधोपचारही देण्यात आले.याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा श्री डॉ दीपक पाटील साहेब व मा सौ डॉ स्वाती दीपक पाटील भाजपा राज्य परिषद सदस्या भाजपा महिला प्रदेश सचिव महाराष्ट्र संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नर्सिंग स्टॉफ व कर्मचारी पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक बांधव, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.नागरिकांनी अशा प्रकारच्या उपक्रमांचे मनापासून कौतुक केले असून जवळजवळ 2000 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आरोग्य जनजागृतीसाठी हा शिबिर उपयुक्त ठरला आहे
आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा

Translate »
error: Content is protected !!