ब्रेकिंग न्यूज

आटपाडी पोलिसांची दमदार कामगिरी..बँकेच्या खात्यातून गायब झालेले पैसे खातेदाराला मिळवून दिले……सायबर गुन्हे अन्वेषण कडे केली होती तक्रार


आटपाडी पोलिसांची दमदार कामगिरी..बँकेच्या खात्यातून गायब झालेले पैसे खातेदाराला मिळवून दिले……सायबर गुन्हे अन्वेषण कडे केली होती तक्रार

सांगली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग हातेकर
झरे ता.आटपाडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेतील ग्राहकाच्या खात्यावरील 12700 रुपये डीबिड झाले होते.याबाबत ज्यांचे पैसे गेले होते त्या ग्राहकाने सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे गुन्हा नोंद केला होता. त्या अनुषंगाने आटपाडी पोलिस अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवली व अखेर त्या ग्राहकाला पोलिसांनी न्याय मिळवून दिला.. या पोलिसांच्या दमदार कामगिरीचे सर्व तालुक्यातून कौतुक होत आहे. याबाबत माहिती अशी की झरे ता आटपाडी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये त्या ग्राहकाचे खाते आहे व तसेच कर्जाचेही खाते आहे त्या ग्राहकाला अचानक फोन आला आणि मैने कितने बार फोन किया. आप रिप्लाय नही देते आपको एसएमएस आया है उसमे ओटीपी है वो तुरंत दिजीये,नाही तो आपका खाता तुरंत बंद होगा असे म्हटल्यानंतर त्या ग्राहकाने ओटीपी दिला आणि त्या ग्राहकाच्या खात्यावरील 12700 डिबीट झाले. होते.तर फोन येण्यापूर्वी Boi ने सुरुवात होत असलेले अनेक एसएमएस आले होते . त्या ग्राहकाला वाटले होते की बँक ऑफ इंडिया मधूनच एस एम एस आले आहेत. म्हणून त्या ग्राहकाने ओटीपी सांगितला ओटीपी सांगितल्या सांगितल्या लगेच 12 हजार 700 रुपये डेबीड झाले होते.आपली फसवणूक झाली आहे हे त्यांच्या दहा ते पंधरा मिनिटानंतर लक्षात आले तोपर्यंत पैसे खात्यातून गेले होते त्यानंतर आटपाडी पोलिसांशी संपर्क साधला व आटपाडी पोलिसांच्या माध्यमातून सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार नोंद केली. सायबर गुन्हे अन्वेषण विभागाने तातडीने तपास करून आज त्या ग्राहकाला त्याचे पैसे त्याच्या खात्यावरती मिळाले असल्याचे ग्राहकाने सांगितले.तसेच आटपाडी पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने तपास करून ज्या खात्यावरती पैसे गेले आहेत ते खाते गोठवले होते दोन दिवस पोलीस अधिकारी प्रयत्न करीत होते शेवटी दोन दिवसानंतर यश मिळाले व ज्या ग्राहकाचे पैसे खात्यावरून गायब झाले होते ते त्या ग्राहकाच्या खात्यावर जमा झाले आहेत. या पोलिसांच्या दमदार कामगिरीचे नागरिकांतून कौतुक होत आहे.


Translate »
error: Content is protected !!