गुरुपौर्णिमेनिमित्त नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने सर्व चालक-मालक बांधवांना आरोग्य विषयी माहिती देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या
गुरुपौर्णिमेनिमित्त नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने सर्व चालक-मालक बांधवांना आरोग्य विषयी माहिती देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या

सांगली प्रतिनिधी इरफान बारगीर -कुपवाड एमआयडीसी येथे नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व चालक बांधवांना आरोग्य विषयी माहिती देण्यात आली नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे यांनी प्रमुख पाहुणे मा सुनील बामणे सर यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आरोग्य विषयी मार्गदर्शन करताना एलिमेंट्स वेलनेस या कंपनीचे मा.सुनील बामणे सर यांना आरोग्य व शेती विषयावर सर्व चालक मालक बांधवांना मार्गदर्शन खूप चांगले केलें यावेळी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवतेज ट्रान्सपोर्ट चे मालक मा.राजू शिंदे ऑल इंडिया उपाध्यक्ष सीबीएस न्यूज चे सांगली जिल्हा विभागीय संपादक मा. इरफान बारगीर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व चालक-मालक बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच विना अपघात करणाऱ्या चालकांचाही फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आनंद बाबुराव चव्हाण, चंद्रकांत पाटील, दादासो यमगर, कृष्णा चौगुले , अविनाश दांड ,दिलीप वाघमोडे ,सचिन येरोडे ,राजकुमार यमगर ,विशाल पांढरे ,नितीन पाटोळे ,विजय सौदे, रणजीत शिंदे ,सचिन जाधव ,व अनेक चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते




