एक कॉल प्रॉब्लेम सॉल..- राज्याध्यक्ष शिवानंद भरले पेन्शनर संघटनेतर्फे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा सत्कार संपन्न..
सांगोला प्रतिनिधी – रवीराज शेटे
शिक्षकी पेशातून काम करीत असताना रस्त्यावर लढलो व रणांगणातून बाहेर गेलो नाही तसेच डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर देश चालत आहे व त्यामुळे प्रत्येकास बोलण्याचा हक्क आहे तरी सेवानिवृत्त शिक्षकांनी भीती न बाळगता आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र या परंतु यामध्ये संघ, समिती अगर राजकीय मतभेद न ठेवता संघटना मजबूत करा व पाठबळ द्या, आपल्या प्रश्नासाठी एक कॉल करा प्रॉब्लेम सॉल्व करू व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण लढण्यास सदैव तयार आहोत असे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद भरले यांनी सांगोला तालुका पेन्शनर संघटनेच्या सांगोला येथील कार्यालयात सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना मत व्यक्त केले.
सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्री माता फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन राज्याचे अध्यक्ष शिवानंद भरले, जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी, पुणे विभागीय अध्यक्ष सिद्धेश्वर धसाडे, कार्याध्यक्ष काळापा सुतार, सरचिटणीस मल्लिकार्जुन बडदाळ, उपाध्यक्ष शंकर जाधव, सांगोला अध्यक्ष वसंतराव दिघे, उपाध्यक्ष जयवंत नागणे, शंकरराव सावंत, सिद्धेश्वर झाडबुके, विलास नलवडे, दिनकर घोडके, प्रतिभा शेंडे इत्यादींच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक अशोक पाटील, हम जो मुलानी, शिवाजीराव बंडगर, शिवाजी करांडे, श्रीमंत वाघमारे, जगताप, पवार, जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी, संघटनेचे सल्लागार सदाशिव साबळे, प्रभाकर कसबे, जयवंत नागणे, अंबिका शिंदे इत्यादींनी मत व्यक्त केले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक विष्णू राऊत, सिद्धेश्वर जानकर, श्रीमती कांताबाई इंगोले, दत्तात्रेय इंगोले, अशोक पाटील, वसंत नवले, श्रीमती आरिफा शेख, हम जो मुलानी, संजय महाजन, अनुरथ कोळेकर, दत्तात्रय बाबर, चंद्रकांत लिगाडे, बबन पवार, रावसाहेब लेंडवे, विठ्ठल दिघे, संपतराव आसबे, सुरेश ढोले, सुधाकर डांगे, विस्तार अधिकारी असलम इनामदार इत्यादींचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी अरुण वाघमोडे, गंगाराम इमडे, एकनाथ जावीर, नामदेव भोसले, श्रीमती सुनंदा चव्हाण, बापूसो लवटे, लक्ष्मण सावंत, रविराज शेटे, अभिमन्यू कांबळे, दत्तात्रय खामकर, सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार संचालक दिनकर घोडके यांनी मानले.
____________________________
काम करणारा खंबीर नेता..
शिवानंद भरले..
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवानंद भरले हे संघर्ष चळवळीतील असून, काम करणारा खंबीर नेता आहे तरी त्यांच्या मागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे, प्रत्येकास न्याय मिळेल याची हमी देतो.
सिद्धेश्वर धसाडे
पुणे विभागीय अध्यक्ष