मोहऱ्याचे ज्येष्ठ नागरिक कै. हिंदुराव आबा मोहिते यांचे निधन
मोहऱ्याचे ज्येष्ठ नागरिक कै. हिंदुराव आबा मोहिते यांचे निधन

माजी सरपंच शिवाजीराव आबा मोहिते यांचे बंधू, गावावर शोककळा
मोहरे, प्रतिनिधी: शंकर कुंभार – मोहरे गावचे माजी सरपंच प्राध्यापक शिवाजीराव आबा मोहिते यांचे बंधू आणि गावातील ज्येष्ठ नागरिक कै. हिंदुराव आबा मोहिते आण्णा वय वर्ष 76 यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मोहरे गावावर शोककळा पसरली आहे.कै. हिंदुराव आबा हे अत्यंत मनमिळाऊ, सुसंस्कृत आणि सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्व होते. गावातील सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असे. त्यांच्या साध्या आणि प्रेमळ स्वभावामुळे ते सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले होते.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन विधीसोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी मोहरे येथे होणार आहे.कै. हिंदुराव आबांच्या निधनाने मोहरे गावातील एक आधारस्तंभ हरपला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
—




