माणगंगा परिवार अर्बन को- ऑप क्रेडिट सोसायटी मध्ये डॉक्टर दिन व कृषी दिन साजरा
नाझरे प्रतिनिधी – रवीराज शेटे
माणगंगा परिवार अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी शाखा नाझरे ता. सांगोला तर्फे बँकेत डॉक्टर डे व कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. कन्हैया सोनवणे व डॉ. ऐश्वर्या सोनवणे तसेच डॉ. नामदेव देशमुख यांचा व कृषी दिनानिमित्त रविराज शेटे यांचा शाखाधिकारी प्रशांत होवाळ यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
माणगंगा परिवार तर्फे एक सामाजिक बांधिलकी जोपासून वेगवेगळे कार्यक्रम शाखेतर्फे संस्थेचे संस्थापक नितीन (आबा) इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत व त्याचाच एक भाग म्हणून नाझरे शाखेतर्फे सत्कार करण्यात आला असे सीइओ अक्षय मुढे सर यांनी सांगितले. यावेळी कर्मचारी प्रणाली बाबर व सुनील साळुंखे उपस्थित होते.