श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी नेताजी शिंदे यांची निवड
नाझरे प्रतिनिधी – रवीराज शेटे
श्रीधर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी नेताजी भीमराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे सहसचिव मुकुंद पाटील यांच्या शुभहस्ते नेताजी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन मुख्याध्यापक नेताजी शिंदे यांना सर्वांनी सहकार्य करावे व शाळेची प्रगती करावी असे आवाहन सहसचिव मुकुंद पाटील यांनी केले.
. सदर प्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य यास्मिन मुल्ला, सेवानिवृत्त शिक्षक सुनील भिवरे यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त प्राचार्य यास्मिन मुल्ला यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सदर प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक नवनाथ बंडगर यांनी तर आभार प्रा. विजय गोडसे यांनी मानले.