ब्रेकिंग न्यूज

काशी पिठाच्या जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यात दहिवडकर मठ लक्ष्मी दहिवडी येथे ईस्टलिंग पूजा, आशीर्वचन व मार्ग हा मुक्तीचा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न..


काशी पिठाच्या जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यात दहिवडकर मठ लक्ष्मी दहिवडी येथे ईस्टलिंग पूजा, आशीर्वचन व मार्ग हा मुक्तीचा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न..

सांगोला प्रतिनिधी – रवीराज शेटे
ज्येष्ठ अधिक मासानिमित्त विश्वशांती व लोककल्याणार्थ ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री 1008 काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची दहिवडकर मठ जोंधळे वस्ती लक्ष्मी दहिवडी ता. मंगळवेढा येथे सामुदायिक 52 पात्री ईस्ट लिंग पूजा, महास्वामी चे आशीर्वचन व मार्ग हा मुक्तीचा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा उत्साहात व आनंदमय वातावरणात श्री श्री श्री 108 वेद वेदांताचार्य शिवाचार्य दहिवडकर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
अधिक मासानिमित्त आम्ही बावन गावात धर्मसभा घेऊन दौरा केला परंतु दहिवडकर मठात आज 52 पात्री श्रीगुरु गुरु सिद्ध मनीकंठ शिवाचार्य दहिवडकर महाराज फार हुशार व वेदांताचार्य आहेत कारण बावन गावात केलेला धर्म सोहळ्याचे सर्व श्रेय येथे 52 पात्री ईस्टलिंग पूजा करून सोहळा केला त्यामुळे सर्व धर्म सोहळ्याचे सर्व श्रेय येथील महाराजांना व मठास जात आहे असे काशी जगद्गुरु महास्वामिनी आशीर्वाचनात सांगितले व यावेळी मार्ग हा मुक्तीचा या ग्रंथास दहिवडकर महाराज व वेळापूरकर महाराज यांचे विशेष योगदान असल्याचे सांगून प्रकाशन सोहळा करण्यात आला. यावेळी महा स्वामींची महाआरती उमेश स्वामी व ऍड सौ. कामिनी स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आली तसेच महेश वायकर यांनी प्रास्ताविक केले. तसेच सोमनाथ हिरेमठ स्वामी यांनीही महास्वामीच्या दौऱ्याचे सुंदर आयोजन करून काशीला जाऊन दर्शन होत नाही ते प्रत्यक्ष येते होत असल्याचे महास्वामिनी सांगितले.
मृत्यू हा अटळ आहे त्या अगोदर भगवंताचे चिंतन मंथन करा कारण भक्तीचा महिमा श्रेष्ठ आहे व जेवायला बसल्यावर पोटभर जेवतो व पचण्यासाठी ओवा लागतो त्याप्रमाणे आपण केलेला संसार पचण्यासाठी भगवंताचे, शिवाचे नाम घ्या व सर्वात सुंदर चांगली ईस्ट लिंग पूजा दहिवडकर मठात झाली याचे श्रेय मी महाराजांना व तुम्हा सर्व भक्तांना देतो असे वेळापूरकर महास्वामीजी यांनी आशीर्वाचनात सांगितले. सदर प्रसंगी सोमनाथ स्वामी, उमेश स्वामी, सौ कामिनी स्वामी, शिवकांत गुजरे, महादेव स्वामी, पत्रकार रविराज शेटे, प्रकाश जोंधळे, नंदकुमार जोंधळे, बाळासो जोंधळे, पांडू जोंधळे, महेश स्वामी, मल्लिकार्जुन शास्त्री, राजस्थान वरून आलेले दीपक जंगम, सुरेंद्र जंगम व सांगोल्यातील रुद्र महिला मंडळ इ. महास्वामींच्या हस्ते श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समाज भूषण मल्लिकार्जुन घोंगडे, अमर दादा लोखंडे, गिरीश भाऊ नष्टे, विश्वविक्रमवीर श्रीधर पैलवान, रविराज स्वामी, सुनील पाटील, बार्शी, दहिवडकर मठाचे भक्तगण, महिला, ग्रामस्थ,, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————–
मार्ग हा मुक्तीचा ग्रंथ प्रसाद रुपी… वेद वेदांताचार्य श्री श्री श्री 108 शिवाचार्य दहिवडकर महास्वामीजी.
काशी जगद्गुरु महास्वामीजी यांनी धर्म जागृती व मार्गदर्शनाचे काम बावन गावात केले व त्यांचा मार्ग हा मुक्तीचा ग्रंथ सर्वांनी घेऊन वाचा म्हणजे गुरुप्रती सेवा मिळून हा ग्रंथ प्रसाद रुपीस रूपात सर्वांना मिळणार आहे व नाझरे ता. सांगोला येथेही काशी जगद्गुरु महास्वामींचा कार्यक्रम भव्य व दिव्य झाला तसेच दहिवडकर मठात ही सुंदर व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Translate »
error: Content is protected !!